कविवर्य राजा नीळकंठ बढे यांच्या जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या गीतातील दोन कडव्यांना “महाराष्ट्र राज्यगीत” म्हणून महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली आहे.
राजा बढे यांचा आज जन्मदिवस (नागपूर: १ फेब्रुवारी १९१२).*
*”कविवर्य राजा नीळकंठ बढे यांच्या जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या गीतातील दोन कडव्यांना “महाराष्ट्र राज्यगीत” म्हणून महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली आहे.*
*राजा बढे हे महाराष्ट्रातील एक मराठी कवी होते. राजाभाऊंचे प्राथमिक शालेय शिक्षण मध्य प्रदेशात छिंदवाड्याला झाले, तर माध्यमिक शिक्षण नागपूरच्या टिळक विद्यालयात. राजा बढे १९३० साली पंजाब विद्यापीठातून मॅट्रिक झाले. पुढची पाच वर्षे अशीतशीच घालवून ते १९३५ साली त्यांनी पुण्याच्या दैनिक सकाळमध्ये उमेदवारी केली.*
*नंतर ते मुंबईत आले. सन १९५६ ते १९६२ या काळात ते मुंबई आकाशवाणीवर सुगम संगीत विभागाचे प्रोड्यूसर होते.*
*त्यांनी छत्रपती शिवाजी राजावर एक चित्रपट निर्माण केला.*
*राजा बढे यांची अनेक गाणी रेकाॅर्ड झाली आहेत. जेव्हा ‘प्रकाश पिक्चर्स’ सावरकरांकडे ‘राम-राज्य’ चित्रपटासाठी गाणी लिहिण्याची मागणी करायला गेले, तेव्हा सावरकरांनी बढेंचे नाव सुचविले.*
*मुंबई आणि नागपूर येथील चौकांना “कवी राजा बढे चौक” यांचे नाव देण्यात आले आहे.*
*महाराष्ट्राचा प्राचीन राजा “हाल सातवाहन” ह्याच्या काव्यांचे संकलन असलेल्या ‘गाथा सप्तशती’चा मराठी अनुवाद हा राजा बढे यांच्या लेखनाची अत्युच्च कार्यसिद्धी समजली जाते.*
*राजा बढे यांचा आज जन्मदिवस (नागपूर: १ फेब्रुवारी १९१२).*
*राजा बढे यांना त्यांच्या जन्मदिनी मानाचा मुजरा*