आज मोदी सरकारने देशाचा अर्थ संकल्प जाहीर केला शेतकऱ्यांच्या दृष्टीने या अर्थ संकल्पला सर्वात मोकार, टुकार,पांचट म्हणता येईल-हरीभाउ महाजन
आज मोदी सरकारने देशाचा अर्थ संकल्प जाहीर केला
शेतकऱ्यांच्या दृष्टीने या अर्थ संकल्पला सर्वात मोकार, टुकार,पांचट म्हणता येईल
२०२२ पर्यंत शेतकऱ्यांच उत्पन्न दुप्पट करण्याच्या वलग्ना करणार सरकार २०२२ संपताच शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देणार असल्याच सांगतंय
त्यामुळे आज काही प्रमाणात आयात करावा लागत असलेला शेतमाल पूर्णपणे आयात करावा लागून शेती अन शेतकरी संपविण्याचा चंगच मोदी सरकारने बांधल्याच आजवरच्या सर्वच शेती विषयक धोरणांवरून दिसून येतं.
वास्तविक सरकारने सलग चार वर्ष अतिवृष्टी ने बरबाद झालेल्या शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव,शेतीसाठी लागणाऱ्या सर्वच वस्तू करमुक्त करणे.वीज,पाणी,
रस्ते,बाजार सुविधा,अनावश्यक आयात थांबवून निर्यातीस प्रोत्साहन देणे गरजेचे असतांना
लोकसंख्येच्या ऐशी टक्के रोजगार देणाऱ्या शेती क्षेत्रास वाटाण्याच्या अक्षदा लावल्याने शेतकरी संपलाच आहे पण देशही भिकेला लागेल
हरीभाऊ महाजन
तालुकाध्यक्ष
प्रहार शेतकरी संघटना येवला