यावल-ब्रहाणपुरातील दुचाकी चोरट्यांनी एमआयडीसी पोलिसांनी अटक
यावल-ब्रहाणपुरातील दुचाकी चोरट्यांनी एमआयडीसी पोलिसांनी अटक
प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव: दुचाकी चोरी प्रकरणी दोन आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी अटक करित त्यांच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त केले आहेत.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन सुरेश सपकाळे, (वय-२३) रा. मालोद ता. यावल, आणि अजीमोद्दीन नसीरोमोद्दीन (वय-३०) रा. चित्रा टॉकीज ब्रहाणपूर (मध्य प्रदेश) असे अटकेतील आरोपींची नाव आहेत.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा ७७३/२२ नुसार दुचाकी चोरीच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हाच्या तपास पोलीस नाईक विकास सातदिवे यांच्याकडे होता. एमआयडीसी पोलिसांना मिळालेले गोपनीय माहितीनुसार दुचाकी चोरट्यांनी माहीती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नितीन सुरेश सपकाळे आणि अजीमुद्दीन नसीरुद्दीन या दोघांना वेगवेगळ्या भागातून पोलिसांनी अटक केली.
त्यांच्याकडून ७५ हजार रुपये किमतीच्या चोरिच्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. या संदर्भात शनिवार २८ जानेवारी रोजी दुपारी ३:०० वाजता आरोपींविरोधात एमआयडीसी पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आल. पोलीस अधीकक्ष एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीकक्ष चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, पो.हे.कॉ गणेश शिरसाळे, पो.ना किशोर पाटील, विकास सातदिवे, योगेश बारी, पो.कॉ छगन तायळडे, किरण पाटील, यांनी कारवाई केली. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.