महाराणा प्रताप स्मारक समिती,नालासोपारा आयोजित *तुळींज महोत्सव व बाल नगरी* चे आयोजन*
*महाराणा प्रताप स्मारक समिती,नालासोपारा आयोजित *तुळींज महोत्सव व बाल नगरी* चे आयोजन*
*सुहास पांचाळ/पालघर जिल्हा प्रतिनिधी*
नालासोपारा / दि.२८ : महाराणा प्रताप स्मारक समिती, आयोजित *तुळींज महोत्सव व बाल नगरी* कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा महोत्सव, रघुकुल ग्राउंड, टाकी रोड, तुळींज, नालासोपारा (पूर्व) येथे *शुक्रवार २७ जानेवारी २०२३ ते रविवार ५ फेब्रुवारी २०२३, सायंकाळी ५ ते रात्रौ १०* वाजेपर्यंत सुरू राहील असे या कार्यक्रमाचे आयोजक श्री मनोज पाटील यांनी सांगितले आहे.
या तुळींज महोत्सव व बाल नगरी महोत्सवात विविध प्रकारचे खेळ व खाद्य स्टॉल, बाळगोपाळ यांच्यासाठी झुलता आकाश पाळणा व बोटिंगची ही व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच इतरही करमणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
विशेषतः महिलांसाठी हळदीकुंकू, रास गरबा तसेच होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या धर्तीवर पैठणीचाही कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे.
रोज लकी ड्रॉ च्या माध्यमातून भाग्यवंतांना चांदीचे नाणे व बक्षीस भेट स्वरूपात देण्यात येईल.
तरी नागरिकांनी या तुळींज महोत्सव व बाल नगरी महोत्सवाला भेट देऊन आपला आनंद द्विगुणित करावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती या कार्यक्रमाचे आयोजक श्री मनोज पाटील व दिलीप जोशी यांनी केली आहे. त्यांना या कामी जितेद्र पाटील, मनोज बारोट,सतीश भोंडवे व विश्वास सावंत यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.