येवला नगरपरिषद आयोजित स्वच्छ सर्वेक्षण-२०२३,माझी वसुधंरा ३.० स्पर्धेचे बक्षीस वितरण मोठ्या जल्लोषात संपन्न.*
*येवला नगरपरिषद आयोजित स्वच्छ सर्वेक्षण-२०२३,माझी वसुधंरा ३.० स्पर्धेचे बक्षीस वितरण मोठ्या जल्लोषात संपन्न.*
येवला नगरपरिषद आयोजित स्वच्छ सर्वेक्षण-२०२३,माझी वसुंधरा-३.० स्पर्धेचे आज शुक्रवार दि.२७/१/२०२३ रोजी मोठ्या जल्लोषात संपन्न झाले.येवला नगरपरिषदचे मुख्याधिकारी श्री.नागेश मुतकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला,टाकाऊ पासून टिकाऊ,पथनाट्य,ऑडियो जिंगल,व्हिडीओ लघुपट,स्वच्छता टेक्नॉलॉजी अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.आज या सर्व स्पर्धेचे वितरण करण्यात आले.बक्षीस वितरणा आधी गंगा दरवाजा येथून रॅली काढण्यात आली.ही रॅली स्वच्छतेच्या घोषणा देत काळा मारुती मेनरोड, मार्गे डी.जे.रोड येथे आली असता.मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडियमच्या इ.नववी च्या विद्यार्थिनींनी स्वच्छ भारत अभियान यावर पथनाट्य सादर केले.यानंतर ही रॅली फत्तेबुरुज चौक मार्गे नगर परिषद कार्यालय येथे आली. नगरपरिषद येथे मुख्याधिकारी श्री.नागेंद्र मुतकेकर यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरण सोहळा पार पडला.सर्वप्रथम अध्यक्षांच्या हस्ते स्कुलचे शिक्षक व स्पर्धेत परीक्षकाची जबाबदारी पार पडल्याबद्दल अजहर खतीब यांचा व शिक्षिका माधुरी माळी व सुनीता वडे यांचा देखील सत्कार करण्यात आला.यानंतर बक्षीस वितरण पार पडले.सर्वप्रथम स्वच्छता टेक्निलॉजी मध्ये प्रथम क्रमांक मिळविण्याबद्दल कु.चतुर्थी गोविंद गायके हिला सन्मानचिन्ह,
प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.यानंतर पथनाट्य स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविलेल्या इ.४थी च्या विद्यार्थिनी कु.स्वरा मयुर सोनवणे,खदीजा अल्ताफ खान,अक्षदा थोरात,जानवी सोनवणे,राशी सोनवणे,प्रगती ढोले यांना सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.यानंतर पथनाट्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविलेल्या इ.नववीच्या विद्यार्थिनी आदिती खैरनार,स्नेहल वडाळकर,दिव्या सोनवणे,समृद्धी आहेर,अनुष्का देशमुख,गौरी गायकवाड,संस्कृती वाघ,प्रतीक्षा ढमाले,ऋतुजा भोसले,रुचिता खैरनार,प्रगती दाणे,अस्मिता हाडोळे, श्रद्धा रणवरे,गायत्री खैरनार यांना सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी सचिन सोनवणे,अजहर खतीब,दिव्या सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणांत मुख्याधिकारी श्री.नागेंद्र मुतकेकर यांनी स्वच्छतेचे महत्व सांगितले.आपण स्वतः पासून स्वच्छतेची सुरुवात करावी आपले घर,परिसर स्वच्छ ठेवावे,ओला कचरा व सुका कचरा वेगळा ठेवावा.आपणच सर्वजण स्वच्छता दूत आहात.असे नमूद केले.यानंतर स्वच्छतेची प्रतिज्ञा घेण्यात आली.
याप्रसंगी सागर जावळे,श्रीकांत खंदारे,आदी सह अनेक मान्यवर व पालक वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वच्छता समन्वयक प्रा.संदीप बोढरे यांनी केले.
—————————-
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे,उपाध्यक्ष सुदामराव सोनवणे,सरचिटणीस अमोल सोनवणे,खजिनदार मकरंद सोनवणे,संचालक प्रा.राजेंद्र गायकवाड, मयुर सोनवणे,लक्ष्मण सोनवणे, जीवनशेठ गाडे,राजेंद्र सोनवणे,उज्वल जाधव,डॉ.भागीनाथ जाधव,आकाश सोनवणे,जनार्दन जानराव,सौ.विनिताताई अमोल सोनवणे, संगीताताई सोनवणे
तसेच स्कुलचे प्रिंसिपल अल्ताफ खान,गणेश सोनवणे,दीपक खैरनार,अमोल आहेर,प्रशांत बिवाल,चेतना माकूने,सुनीता वडे,नीलिमा देशमुख यांनी अभिनंदन केले.