भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त लहान मुलांतील कौशल्य प्रात्यक्षिक
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त लहान मुलांतील कौशल्य प्रात्यक्षिक
प्रतिनिधि नांदेड हदगांव भगवान कदम
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रथम दीप प्रज्वलन करून भारत मातेचे पूजन शिवचैतन्य शिवाचार्य महाराज महादेव मठ संस्थान हादगावचे मठाधिपती,शिवप्रतिष्ठानचे संगमनेर येथील महाजन गुरुजी,परिसरातील ज्येष्ठ व्यक्ती महत्त्व बापूरावजी शिंदे,माजी सैनिक शामसुंदर पोगरे या सर्वांच्या हस्ते पुजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली
देशभक्तीपर गीतावर लहान मुलींनी चांगला डान्स केल्याबद्दल प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले
हदगाव मधील इच्छापूर्ती महादेव मंदिरामध्ये मागील पाच महिन्यापासून नांदेड येथे प्रशिक्षण घेतलेले श्री बालाजी चिंचोलकर मार्शल आर्ट ब्लॅक बेल्ट नंबर 1 व मास्टर शिव भाऊ पोगरे या दोघांनी लहान मुलांना व मुलींना प्रशिक्षण देऊन त्यामध्ये पारंगत केले.
प्रजासत्ताक दिनाचे अवचित साधून प्रशिक्षण दिलेल्या मुलांना व मुलींचे प्रात्यक्षिक इच्छापूर्ती महादेव मंदिर हदगाव येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त संध्याकाळी 7 वाजता सर्वांसमोर दाखवले.
या लहान मुलांनी प्रात्यक्षिकामध्ये मंचक चालवणे काठी फिरवणे व इतर कला इतक्या कमी वेळात खूप छान शिकल्या व त्यांना शिकवल्या गेल्या त्याबद्दल बालाजी चिंचोलकर व शिव भाऊ पोगरे या दोघांचे देखील परिसरातील सर्वां तर्फे तातेराव पाटील व मिटकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रशिक्षण घेतलेल्या सर्व मुलांना शिव चैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
शिवप्रतिष्ठानचे संगमनेर येथील महाजन गुरुजी यांनी आपल्या संबोधन पर वक्तव्यामध्ये या लहान मुलांना स्वरक्षणासाठी खूप छान शिकवण्यात आले आहे त्याबद्दल या दोघांचे कौतुक केले तसेच इतर पालक वर्गाने देखील आपल्या मुलांना या प्रशिक्षणामध्ये पाठवावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सामाजिक कार्यकर्ते राजू पांडे यांनी केले.
या कार्यक्रमाला प्रशिक्षण घेतलेल्या मुलांचे आई वडील परिसरातील लहान वृद्ध व होतकरू मुलं,भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष तातेराव पाटील,तांबोरे सर,श्रीमंगले सर,जगदीश तावडेजी,शिवशंकर कदम,अविनाश शहाणे परिसरातील सर्वजन उपस्थित होते