ब्रह्माकुमारी येवला शाखेतर्फे हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात
ब्रह्माकुमारी येवला शाखेतर्फे हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा येवला यांचे वतीने गेल्या पंधरा वर्षांपासून अंदरसुल येथेही ज्ञानदानाची सेवा सुरू आहे अंदरसुल येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या लॉन्सवर हळदीकुंकू चा कार्यक्रम महिलांसाठी मोठ्या उत्साहात साजरा झाला.
“सौभाग्याचं लेणं” या विषयावर राजयोगिनी ब्रम्हाकुमारी नीतादीदी येवला सेवाकेंद्र संचालिका यांनी सुंदर मार्गदर्शन केले.महिलांना समाजातील आपले स्थान स्वतः निर्माण करता आले पाहिजे त्याचप्रमाणे विधवा महिलांनाही समाजाने दूर न करता त्यांनाही मान मिळावा हा संदेश देण्यात आला,राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच त्याचे महत्त्वही सांगण्यात आले.आपल्या भारताच्या विद्यमान राष्ट्रपती मा. सौ.द्रोपदी मुरमु यांचाही विशेष नाम उल्लेख करून उदाहरण देण्यात आले की एक स्त्री जीवनात किती आलेल्या संघर्षांना मागे टाकून मेडिटेशन व ईश्वरीय सत्यज्ञानाच्या आधारे जीवनात किती मोठी प्रगती करू शकते 2009 पासून रेगुलर ब्रम्हाकुमारीस च्या सेवा केंद्रात माननीय राष्ट्रपतीची मेडिटेशन व ईश्वरीय सत्यज्ञान म्हणजे मुरली ऐकण्यासाठी येतात या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून येवला कोर्टात प्रॅक्टिस करणाऱ्या एड.कविता पराते याही उपस्थित होत्या त्यांनी स्त्रियांना विविध कायद्यांची माहिती दिली छोट्या छोट्या गोष्टीच्या दैनंदिन व्यवहारांमध्ये आपल्यावर अन्याय होत आहे हे माहीत नसल्यामुळे आपण कुठे न्याय मागू शकत नाही किंवा समाजाला घाबरतो परंतु शासनाने आपल्याला खूप मोठी सुरक्षितता कायद्याने दिलेली आहे जसे बालविवाह प्रतिबंध कायदा होंडा पळी कायदा स्त्री पुरुष समानता कायदा श्री पुरुष समान वेतन कायदा मोठ मोठ्या महाविद्यालयांमध्ये किंवा शाळांमध्ये विशाखा कमिटीची स्थापना होत आहे जे आपल्याला कायदे अनुसार संरक्षण देते त्यांनी आपले माउंट आबू विषयीचे आणि मेडिटेशन विषयीची खूप सुंदर अनुभव सर्वांपुढे व्यक्त केले प्रमुख पाहुणे म्हणून एम.एस.जी.एस.इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.जयश्री परदेशी मॅडम सौ. सुषमा सोनवणे मॅडम सौ.मनीषा संजय नागपुरे मॅडम उपस्थित होत्या अंदरसुल येथील जवळपास शंभर ते दीडशे महिलांनी या कार्यक्रमास हजेरी लावले हळदी कुंकू संक्रांतीचे वाण तिळगुळ प्रसाद तसेच ध्यानाचा आनंद घेत सर्वांनी आपला उत्साह द्विगुणीत केला या सर्व कार्यक्रमाचे आयोजन अंदरसुल येथील तू अंजना मनोहर शेळके तसेच ब्रह्माकुमारी टीमच्या वतीने करण्यात आले होते