जबरी लुट प्रकरणातील पसार आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात
प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव: एक लाख १५ हजारांच्या रोकडसह मोबाईलवर टॅबलेट लूट प्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी एक वर्षासानंतर अटक करण्यात एमआयडीसी पोलिसांनी यश आले आहे. सागर आकाश देवकर (वय-१९) कंजरवाडा जळगाव, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, सुनील शेषराव पाढाळे रा. सहयोगनगर हिवरखेडा रोड जामनेर जि. जळगाव) हा तरुण २२ मार्च २०२२ रोजी वराडे ते विटनेर रस्त्याने जात असतांना त्याच्या ताब्यातील एक लाख १४ हजार ६२९ रुपये रोख मोबाईल, टॅब आणि मोबाईल असा ऐवज हिसकावून घेण्यात आला होता. गुन्हा घडल्यापासून सागर आकाश देहकर हा पसारा झाला होता. आरोपी जळगाव शहरातील जखमी नगर भागात आल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना कळताच पथकाने आरोपीला अटक केली. एमआयडीसी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, यांच्या मार्गदर्शनखाली सहायक पोलिस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, आदींनी आरोपीला अटक केली,