लोखंडी सुरा घेऊन दहशत माजविणाऱ्या रेकॉर्डवरील हद्दपार आरोपी अटक
लोखंडी सुरा घेऊन दहशत माजविणाऱ्या रेकॉर्डवरील हद्दपार आरोपी अटक
प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव शहरात एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील हद्दपार घातक शास्त्रासह अटक करण्यात आली आहे. दिनकर उर्फ पिण्या रोहिदास चव्हाण ( रा. सुप्रीम कॉलनी जळगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
दिनकर चव्हाण हा रामदेव बाबा मंदिर सुप्रीम कॉलनी जळगाव येथे हातात लोखंडी सुरा घेऊन दहशत माजवता असल्याची गुप्त बातमी पोलीस निरीक्षक जयपाली हिरे यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.ना हेमंत कळसकर, सचिन पाटील, पो.कॉ चंद्रकांत पाटील, आदींनी त्यास सुऱ्यासह शिताफीने ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडील सुरा जप्त करण्यात आला आहे.
दिनकर चव्हाण यांच्यावर मालमत्तेसह शरीराविरुद्ध चे एकूण १९ गुन्हे दाखल आहेत. त्याला दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले असताना तो मिळून आला. दि. २४ जानेवारी २०२३ ते ७ फेब्रुवारी २०२३ दरम्यान शास्त्र , सोटे, भाले, तलवारी, बंदुका, सुरे, लाठ्या व काठ्या, किंवा शारिरीक दुखापती करण्यासाठी वापरात येतील असे कोणतेही हत्यार अथवा वस्तू घेऊन फिरणाऱ्यास मनाई असतांना देखील तो शास्त्रासह मिळुन आला. पोलीस निरीक्षक जयपाली हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.ना हेमंत कळस्कर, सचिन पाटील, चंद्रकांत पाटील, आदींनी सहभाग घेतला.