आज ७४ वा प्रजासत्ताक दिन सविता भंडारे क्लासतर्फे उत्साहात साजरा*

*आज ७४ वा प्रजासत्ताक दिन सविता भंडारे क्लासतर्फे उत्साहात साजरा*
*सुहास पांचाळ / पालघर जिल्हा प्रतिनिधी*
नालासोपारा / दि.२६ : आपल्या भारत देशात २६ जानेवारी या दिवसाला खूप महत्त्व आहे. ह्या दिवशी देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. भारतातील नागरिक आपले देशप्रेम व्यक्त करतात. २६ जानेवारी १६५० रोजी संविधान लागू करण्यात आले व हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.
नालासोपारा पश्चिमेकडील, निळेगांवात सविता क्लासेसमध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम सकाळी दहा वाजता, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि क्लासच्या संचालिका सविता भंडारे यांच्याद्वारे संपन्न करण्यात आला. श्री हंसराज पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण पार पडले.
प्रजासत्ताक दिना निमित्त क्लासेसमध्ये वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख पाहुणे श्री निलेश राणे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व या विषयी संबोधित केले तसेच संविधानाचे महत्त्व तसेच संविधान किती महत्त्वाचे आहे याविषयी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून उपस्थित विद्यार्थी यांनी देशभक्तीपर नारे देण्यात आले.
त्यानंतर स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व बक्षीस वितरित करण्यात आली आणि सर्वात शेवटी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे श्री जितेंद्र पाटील, श्री निलेश राणे, श्री सुहास पांचाळ, श्री रमेश पाटील व रमेश तिवारी हे उपस्थित होते. तसेच सविता क्लासेसचे शिक्षक वर्ग व मान्यवरही उपस्थित होते. उपस्थित प्रमुख पाहुणे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.