समाजाला सत्ता मिळवून देणे आमचे मिशन – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले
समाजाला सत्ता मिळवून देणे आमचे मिशन – *केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले
*
भारती धिंगान (प्रतिनिधी)नाशिक*
देशात हिंदुत्ववादाने ढवळून निघालेले राजकारण रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी समजून घ्यावे – डॉ शरणकुमार लिंबाळे
महाबळेश्वरमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या अभ्यास शिबिरात विचारवंतांनी केले मार्गदर्शन
महाबळेश्वर दि. 25 – महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपले प्रश्न सोडविण्यासाठी सत्ता हाती घेण्याचा उपदेश केला आहे. त्यामुळे समाजाला सत्तेचा वाटा मिळवून देण्यासाठी सत्ता मिळविणे हेच आमचे मिशन आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.महाबळेश्वर येथील रिपब्लिकन अभ्यास शिबिराच्या समारोपीय भाषणात ते बोलत होते.रिपब्लिकन पक्ष भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या सोबत युती मध्ये असुन आगामी सर्व निवडणूका आम्ही भाजप बाळासाहेबांची शिवसेना यांच्या सोबत युती करून लढणार आहोत मात्र भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना सोबत आमच्या रिपब्लिकन पक्षाचे नाव घेतले जात नाही.ही खंत आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सांगणार आहोत असे ना.रामदास आठवले यावेळी म्हणाले.
रिपब्लिकन पक्षाचे संघटन सर्व समाज घटकांना सोबत घेऊन व्यापक करावे. पक्ष संघटन मजबूत करावे.रिपब्लिकन पक्षाला सत्तेत सन्मानाचा वाटा घ्यायचा असेल तर पक्षसंघटन माजबूत करावे असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना केले.
शेतमजुरांना पेन्शन मिळवून देण्यासाठी; गायरान जमिनी च्या प्रश्नासाठी; प्रमोशनमध्ये रिझर्वेशन; आणि खाजगी क्षेत्रात एस सी एस टी साठी आरक्षण मिळावे या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाने आंदोलन उभारले पाहिजे असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले.रोजगार शिबिर; उद्योग आघाडी;पर्यावरण या सर्व क्षेत्रात आणि सर्व समाज घटकांत मिसळून कार्यकर्त्यांनी काम करून पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सत्ता मिळवा; सत्तेतूनच प्रश्न सुटणार आहेत हा मार्ग सांगितला आहे.त्यामुळे जो पक्ष आपल्याला सत्तेत वाटा देईल त्या पक्षासोबत जाण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे.पूर्वी समविचारी पक्षांशी युती होत होती.आता परस्पर विरोधी विचारधारेच्या पक्षांशी युती होऊन सत्तेत वाटा मिळविता येऊ शकतो.राजकीय कार्यकर्त्यांला कोणीही शत्रू नसतो हे समजून घेतले पाहिजे त्यासोबत आज हिंदुत्ववादाने ढवळून निघालेले राजकारण रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे असे आवाहन आज प्रसिद्ध आंबेडकरवादी विचारवंत डॉ.शरणकुमार लिंबाळे यांनी रिपब्लिकन अभ्यास शिबिराच्या उदघाटन प्रसंगी केले.
महाबळेश्वर येथे हॉटेल ब्ल्यू पार्क मध्ये आयोजित रिपब्लिकन पक्षाच्या एक दिवसीय अभ्यास शिबिरात ते उदघाटक म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले उपस्थित होते.या अभ्यास शिबिराचे उत्कृष्ट संयोजन रिपाइं चे सातारा जिल्हा अध्यक्ष अशोक गायकवाड; युवा नेते स्वप्नील गायकवाड यांनी केले. डॉ.अच्युत माने; डॉ ऋषिकेश कांबळे; ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे; ऍड.दिलीप काकडे यांनी रिपब्लिकन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे; राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; सौ.सीमाताई आठवले; शिलाताई गांगुर्डे;ऍड.आशाताई लांडगे; पप्पू कागदे; प्रा. शहाजी कांबळे;पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे; परशुराम वाडेकर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
मागील दोनशे वर्षात परिवर्तन चळवळीने जातिवादी धर्मांध शक्तींना शिव्यांची लाखोली वाहिली आहे. आता देशाचे राजकारण बदलत आहे. त्यांची वैचारिक भूमिका वेगळी म्हणून त्यांच्याशी युती नको हा जुनाट आणि चुकीचा विचार झाला. आता बदलत्या राजकारणात आपण सत्तेत वाटा देईल त्यांच्या सोबत गेले पाहिजे.भाजप सोबत आपण आहोत त्यात काही चूक नाही.आपली भूमिका जनतेत कार्यकर्त्यांनी मांडली पाहिजे. प्रतिवाद केला पाहिजे.आणि सोशल मीडियातील टोलर्स ला ठोकले पाहिजे.अनेक लोक समाजकार्यात नसतात काहीच त्यांचा समाजसेवेशी संबंध नसतो केवळ नोकरी करून भरल्या पोटी ते सोशलमीडियात नकारात्मक विचार मांडत असतात अशा टोलर्स ला वैचारिक ठोकले पाहिजे असे आवाहन डॉ शरण कुमार लिंबाळे यांनी केले.
दलित पँथर च्या सुवर्णमहोत्सवी वर्षात विचारवंत साहित्यिकांनी भारतीय दलित पँथर ला अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र दलित पँथर ही केवळ मुंबईपर्यंत सीमित आणि केवळ 2 वर्ष टिकलेली चळवळ होती. मात्र भारतीय दलित पँथर हे देशभर गावागावात पोहीचलेली आणि 20 वर्ष टिकलेली चळवळ होती.भारतीय दलित पँथरने डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढा लढला; रिडल्स; गायरान जमिनीचे प्रश्न;झोपदपट्टीचे प्रश्न;दलित अत्याचाराचे प्रश्न असे अनेक आंदोलने केली.जगात सर्वात जास्त आंदोलन मोर्चे काढणारे नेते कोण असेल तर ते रामदास आठवले आहेत.त्यांनी रिपब्लिकन कार्यकर्त्यांना सर्वाधिक सत्ता मिळवून देण्याचे काम केले आहे. ग्राम पंचायत सरपंच; जिल्हा परिषद; नगरसेवक;आमदार ; महामंडळ आणि मंत्रीपदे ही मिळवून देणारे नेते रामदास आठवले आहेत.
असा ना.आठवलेंचा गौरव यावेळी डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी केला. समाजात आता मात्र दलित पँथर ची गरज नाही.दलित पँथर ची गरज आहे असे सांगणारे लोक नकारात्मक वातावरण बनविणारे लोक आहेत. ते आंबेडकरी चळवळीचे हितशत्रू आहेत असे सांगत डॉ शरण कुमार लिंबाळे यांनी कार्यकर्त्याना अभ्यास करण्याचे आवाहन केले.
आपल्याला मिळालेला सरस्वती सन्मान हा हिंदुत्ववादी पुरस्कार नाही. माझी सनातन ही कादंबरी देशात सर्वश्रेष्ठ ठरलेली कादंबरी आहे.मात्र मला समाजापासून तोडण्यासाठी अपप्रचार झाला असल्याचे डॉ शरण कुमार लिंबाळे म्हणाले.
केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी 11 वर्षांपूर्वी केलेली शिवशक्ती भीमशक्ती भाजप युती यशस्वी ठरली. त्यावेळी कोणीही आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व शिवसेना किंवा भाजप शी युती करण्याची हिम्मत करीत नव्हते.मात्र ती युती ना.रामदास आठवले यांनी यशस्वी करून जनतेने स्वीकारल्या नंतर अलीकडे जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आणि प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत युती करून 11 वर्षांपूर्वी रामदास आठवले यांनी घेतलेली भूमिका योग्य होती हाच संदेश दिला आहे.मात्र त्यांनी रामदास आठवले यांच्या सोबत एकत्र येऊन ही भूमिका घेतली असती तर ती आंबेडकरी रिपब्लिकन राजकारणाची ताकद वाढविणारी भूमिका ठरली असती असे रिपाइं चे सरचिटणीस अविनाश महातेकर यावेळी म्हणाले. यावेळी मुंबईतून रिपाइं चे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; परिवर्तन कला महासंघाचे साहेबराव सुरवाडे; श्रीकांत भालेराव; रमेश मकासरे; मिलिंद शेळके;ब्रह्मानंद चव्हाण; सुनील साळवे; बाळकृष्ण इंगळे; विनोद थुल; विनोद निकाळजे; रिपाइं युवा अध्यक्ष सचिनभाई मोहिते; घनश्याम चिरणकर;ऍड.अभयाताई सोनवणे;उषाताई रामळू; जयश्री कांबळे; सोना कांबळे; संजय डोळसे;सुभाष साळवे;श्रीधर साळवे;अंकुश कांबळे; बापू जगधने; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपिसे.