*नशिराबाद येथील उरस मध्ये रंगल्या कुस्त्यांच्या स्पर्धा*

*नशिराबाद येथील उरस मध्ये रंगल्या कुस्त्यांच्या स्पर्धा*
प्रतिनिधी शाहिद खान
नशिराबाद येथे सुरू असलेल्या यासीन मिया कादरी यांच्या उरूस निमित्त गुरुवारी दुपारी कुस्त्यांची दंगल घेण्यात आली. यात महाराष्ट्रातील नव्हे तर गुजरात व मध्य प्रदेशातील पैलवानांनी सहभाग घेतला. दहा वर्षापासून ते पन्नास वर्षापर्यंत पैलवानांचा यात सहभाग दिसून आला एकूण ७२ कुस्त्या घेण्यात आल्या त्यात १०० रुपयांपासून ९००० रुपये पर्यंत लढत करून त्यांना रोख पारितोषिक देण्यात आले.
उरस कमिटी सह उपस्थित लालचंद पाटील,विकास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे, जळगाव जिल्हा क्रीडा संघटक व मार्गदर्शक फारूक शेख, ए यु फौंडेशन चे अन्वर सिकलगर, यांच्यासह इतरांनी सुद्धा कुस्तीगीरांना रोख पारितोषिके दिली.
स्पर्धेची शेवटची कुस्ती पाचोऱ्याचे अल्ताफ व कन्नडचे मुसा यात झाली व त्यात मुसा कन्नड याने ही स्पर्धा जिंकून पारितोषिक मिळवले.
विजेत्या पैलवानांना उरूस कमिटी व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात येत होते.
कुस्त्या यशस्वीते साठी समितीचे अध्यक्ष बरकत अली,बाला सेठ, चांद मेंबर, अय्युब मेंबर आदींनी परिश्रम घेतले.
फोटो कॅप्शन
शेवटची कुस्ती विजेता मुसा कन्नड यांना पारितोषिक देतात फारुख शेख, बरकत अली, अनवर सिकलगर, फजल कासार आदी दिसत आहे
२) लहान गटातील विजयी पैलवान यांना पारितोषिक देताना सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे सह फारूक शेख,बरकत अली आदी दिसत आहे