रेकॉर्डवरील गुन्हेगार बिलाल चौकातील; जुनैद बवाली दोन वर्षासाठी हद्दपार
रेकॉर्डवरील गुन्हेगार बिलाल चौकातील; जुनैद बवाली दोन वर्षासाठी हद्दपार
प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव शहरातील बिलाल चौकात राहणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारला दोन वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. त्यांच्यावर वेगळेवेगळे पाच प्रकाराचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. बुधवारी १८ जानेवारी रोजी सकाळी १० प्रांतअधिकारी महेश सुधाकर यांना देश काढले आहे.
शेख जुनैद उर्फ (बवाली) शेख युनूस (वय-२६) रा. नवीन तांबापुरा बिलाल चौक जळगाव, असे हद्दपार केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत शेख जुनैद याच्या विरोधात हद्दपारच्या प्रस्ताव एमआयडीसी पोलीसांनी तयार करून उपविभागीय अधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले होते. या गुन्हेगारावर वेगळेवेगळे पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच तांबापुरा परिसरातील दहशत माजवून परिसरातील वातावरण गढुळ करण्याचे काम करत होता. महेश सुधाकर यांनी एमआयडीसी पोलिसांनी पाठविलेला हद्दपारच्या प्रस्तावात गंभीर दाखल घेत गुन्हेगार शेख जुनैद उर्फ (बवाली) याला जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केले. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक एम राज कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत गवळी, सो, यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पो.उप.नि. आनंदसिंग पाटील, सायक फौजदार अतुल वंजारी, पो.ना योगेश बारी, सचिन पाटील, यांनी कारवाई शेख जुनैद याला जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.