मुलींसाठी मासिक पाळी मधील स्वच्छता आणि हायजिन विषयी जागरूकता घडवणारा विशेष एक प्रोग्राम घेतला.

नॅशनल रतनाम कॉलेज , भांडुप आणि आस्मी हायाजीन प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमटेड ह्यानी १३जानेवारी २०२२ रोजी रतनाम कॉलेजच्या मुलींसाठी मासिक पाळी मधील स्वच्छता आणि हायजिन विषयी जागरूकता घडवणारा विशेष एक प्रोग्राम घेतला. ह्या प्रोग्राम मध्ये रतनाम कॉलेजच्या २०० हून जास्त मुली हजार होत्या. लॉफ्लीटरच्या संस्थापक- ॲड शिवांगी झरकर ह्यांनी प्लास्टिक युक्त सानिटरी नॅपकीनचा निसर्गाला होणारा त्रास आणि निसर्ग आणि मानवी अधिकार आणि त्यासंदर्भात असणाऱ्या कायद्यांची माहिती दिली. त्याच सोबत सनिटरी नॅपकिनची एक्सपायरी डेट, त्यातील घटक कोणते आणि कसे तपासावे ह्यांची बारकाईनी माहिती दिली. तसेच आस्मी ग्रुपच्या संस्थापक – सुजाता चव्हाण ह्यांनी मासिक पाळीत प्लास्टिक युक्त सनिटरी नॅपकिन ने होणारे आजार , योग्य कॉटन युक्त सनिटरी नॅपकिन कसे ओळखावे आणि वापरावे ह्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले आणि विद्यार्थिनीनीं विशेष जागृती घडवली. रतनम कॉलज आणि आस्मी ग्रुपने घेतलेल्या ह्या नावीन्यपूर्ण कार्यक्रमामुळे कित्येक विदयार्थीनीं मध्ये सामाजिक जागृती घडून आली.