जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचखेड येथे प्रथमोपचार पेटी भेट
मनोहर देसले / तालुका प्रतिनिधी

चिंचखेड येथील गजानन मेडीकलचे मालक श्री. रणजित जगताप हे दरवर्षी प्राथमिक शाळेसाठी प्रथमोपचार पेटी भेट देत असतात श्री रणजीत भाऊ यांनी या वर्षी देखील शाळेसाठी सुमारे 1000/ एक हजार रुपये किंमतीचा प्रथोपोमचार बाॅक्स भेट देऊन शाळेतील मुलांचे आरोग्य चांगले रहावे त्यांच्यावर तत्काळ प्रथमोपचार करता यावा ही सामाजिक जाणीव लक्षात घेऊन आपले दात्रृत्व पुन्हा एकदा सिद्ध केले व गावातील विद्यार्थी सहलीसाठी जात असल्याचे समजल्यावर सहलीसाठी शुभेच्छा दिल्यात.याबद्दल मुख्याध्यापक श्री संजय चौधरी यांनी रणजीत भाऊ यांच्या कार्याचा गौरव केला. सदर कार्यक्रमासाठी श्री.शंकर ठाकरे सर,श्री.भामरे सर श्री. डंबाळे सर,श्री.कोंडावार सर,श्री.राठोड सर,श्री.प्रतिभा मॅडम श्री. प्रकाश सर सर्व शिक्षक उपस्थित होते.या प्रसंगी भामरे सर यांनी आपल्या खुमासदार शैलीत श्री. रणजित भाऊ जगताप यांचे अभिनंदन करुन आभार मानले.