जळगावातील सुंदर नगरात घरफोडी; ५० हजारांचा ऐवज लंपास
जळगावातील सुंदर नगरात घरफोडी; ५० हजारांचा ऐवज लंपास
प्रतिनिधी शाहिद खानटा
जळगाव शहरातील सुंदर नगर भागातील बंद घरातून चोरट्यांनी ५० हजारांचा ऐवज लांबवल्याची घटना १४ ते १५ जानेवारी दरम्यान घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अधिक माहिती अशी की, संदीप रामलाल चौधरी (वय-३८) हे आपल्या कुटुंबीयांसह सुंदर नगरात वास्तव्यास असुन ते कुटुंबासह बाहेरगावी गेल्याने १४ ते १५ ता. दरम्यान चोरट्यांनी संधी साधत बेडरूमच्या खिडकीचे लोखंडी गज वाकवत घरात प्रवेश केला. कपाटाच्या लॉकर मधून बारा हजार रुपये किमतीची ३ ग्राम वजनाची सोन्याची अंगठी, १८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे झुमके, ८ हजार रुपये दोन ग्राम वजनाच्या सोन्याच्या बाह्य तसेच ११ हजारांची रोकड असा एकूण ४९ हजारांचा ऐवज लांबवला. चौधरी हे बाहेरगावाहून आल्यानंतर चोरीच्या प्रकार लक्षात आला. त्यांनी शनिपेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर अज्ञात चोरट्यान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनखाली उपनिरीक्षक मुबारक तडवी करीत आहे.