ताज्या घडामोडी
पतोंडा गावाजवळ जुगार खेळणाऱ्यावर कारवाई.. ५ जणांवर कारवाई..
पतोंडा गावाजवळ जुगार खेळणाऱ्यावर कारवाई..
५ जणांवर कारवाई….
प्रतिनिधी शाहिद खान
चाळीसगाव – तालुक्यातील पातोंडा गावाजवळ झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळताना ५ जणांना चाळीसगाव शहर पोलिसांनी दि १५ रोजी दुपारी २:०० वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जुगाराचे साधने व ३१ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई पो नि के के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो ना दिपक पाटील, राहुल सोनवणे, भुषण पाटील, पो कॉ विनोद खैरनार, निलेश पाटील, विजय पाटील, रवींद्र बच्छे, प्रविण जाधव, सुनील निकम यांनी केली.