भडगाव रोडवर पेट्रोल पंपाजवळ पकडलेला वाळूचा डंपर घेऊन चालकाचे पलायन…. चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा…
भडगाव रोडवर पेट्रोल पंपाजवळ पकडलेला वाळूचा डंपर घेऊन चालकाचे पलायन….
चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा…
प्रतिनिधी शाहिद खान
चाळीसगाव – तालुक्यातील भडगांव रोड वरील मंडाई पेट्रोल पंपासमोर महसूल पथक गस्त घालत असताना करड्या रंगाचा, अशोक लेलँड कंपनीचा, विना नंबरचा डंपर हा वाळु या गौणखनिजाची वाहतुक करीत असतांना थांबवण्याचा प्रयत्न केल्याने डंपर चाळीसगांव शहराकडे पळवून नेला त्याचा पाठलाग करून थांबवल्यावर चालकाने सदर डंपर देवळी येथील गणेश पाटील यांच्या मालकीचे आहे असे सांगुन, डंपर चालक व मालक यांच्याकडे डंपरमध्ये असलेल्या गौण खनिज वाळु वाहतूक करण्याच्या परवान्यावाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठलाही वाहतुकीचा परवाना त्यांच्याकडे नसल्याचे सांगितले. पंचनामा करून गौणखनिज (वाळु) ने भरलेले डंपर पोलीस ग्राऊंड, चाळीसगाव येथे लावण्यासाठी घेवुन चल असे सांगितल्याने डंपर चालकाने आम्हारा होकार देवुन, सदरचे डंपर पोलीस ग्राऊंडला लावतो असे सांगुन, डंपर घेऊन पलायन केले याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस नाईक भुषण पाटील करीत आहेत.