ताज्या घडामोडी
पाटणादेवी चण्डिकादेवी मंदिरातील दान पेटी फोडून दिड लाखाची रोकड लांबवली..

पाटणादेवी चण्डिकादेवी मंदिरातील दान पेटी फोडून दिड लाखाची रोकड लांबवली..
चाळीसगाव प्रतिनिधी – तालुक्यातील पाटणादेवी चण्डिका देवी मंदिराची दानपेटी फोडून त्यातील अंदाजे दिड लाख रुपये रक्कम व खालील मंदिराची दानपेटीच अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि 13 रोजी रात्री 12-30 ते पहाटे 3-30 वाजेच्या सुमारास घडली असून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे या मंदिराच्या सुरक्षेसाठी पुरातत्व विभागाचे कर्मचारी असताना ही घटना घडली. असून चोरटे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
झालेल्या घटनेने भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली असून पुढील तपास चाळीसगाव ग्रामीण स पो नि धरमसिंग सुंदरडे करीत आहेत