पहुर बंद घरातुन १६ लाख ९० हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीच्या दागिन्या व रोकड लांबविणऱ्या टोळीच्या पर्दाफाश ; पाच संशयितांना अटक
पहुर बंद घरातुन १६ लाख ९० हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीच्या दागिन्या व रोकड लांबविणऱ्या टोळीच्या पर्दाफाश ; पाच संशयितांना अटक
प्रतिनिधी शाहिद खान
जामनेर तालुक्यातील पहुर येथील बंद घर फोडुन सोन्याचे दागिने व रोकड असा लाखो रुपये किमतीच्या मुद्देमाल लांबविणाऱ्या टोळीच्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने पर्दाफाश केला असून या गुन्ह्यातील पाच संशयित आरोपींना टक्के केली आहे. यात एक महिलेच्या समावेश आहे. त्यांच्याकडून चोरी पैकी १६ लाख ९० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. जामनेर तालुक्यातील पाहून येथे एकाचे बंद घर फोडुन सुमारे लाखो रुपये किंमतीचा सोन्याचे दागिने व रोकड असा मुद्देमाल चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली होती.
या संदर्भात पहुर पोलीस ठाण्यात २९ ऑगस्ट २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रमेश चोपडे, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पहुर येथे धाडसी घरफोडी करणारे संशयित आरोपी हे जळगाव शहरातील असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत. सय्यद सरजील सय्यद हरून, ( वय-२७) रा. मास्टर कॉलनी जळगाव, अनिल रमेश चौधरी ( वय-४०) रा. आयोध्या नगर जळगाव, सैय्यद अराफत सैसय्यद फारूक, (वय-३३ रा. तांबापुरा जळगाव), सैय्यद अमीन (उर्फ बुलेट) सैय्यद फारुख, (वय-३३ रा. तांबापुरा जळगाव), आणि भावना जवाहरलाल जैन (लोढा) अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या रकमेपैकी १६ लाख ९० हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पाचही जणांना पुढील कारवाईसाठी पावर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रमेश चोपडे, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, यांच्या मार्गदर्शनखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार अनिल जाधव, रवी नरवाडे, पोलीस हे.का संजय हिरवाकर, विजयसिंह पाटील, राजेश लोढे, सुधाकर अंभोरे, कमलाकर बगुल, अनिल देशमुख, अक्रम शेख, पोलीस नाईक संतोष मायकल, नितीन बाविस्कर, नंदलाल पाटील, विजय महाजन, विनोद पाटील, सचीन महाजन, ईश्वर पाटील, महिला पोलीस कॉन्स्टेबल अभिलाषा मनोरे, वैशाली सोनवणे, अश्विनी सावकारे, आणि रूपाली खरे, अशा पथकाने कारवाई केली. तर सपोनी वसंत कांबळे, पो.उ.नि सचिन डोंगरे, पो.हे.का जयंत चौधरी, पो.ना विनायक पाटील, पो.ना किशोर मोरे, पो.ना सचीन चौधरी यांनी तांत्रिक सहाकार्य केले.