तीन गावठी कट्टे व सहा जिवंत काडतुसांसह ; नाशिकमधील तरुण जाळ्यात

तीन गावठी कट्टे व सहा जिवंत काडतुसांसह ; नाशिकमधील तरुण जाळ्यात
प्रतिनिधी शाहिद खान
शिरपूर तालुका नॅशनल तस्करी करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील सात तरुणांच्या मुस्क्या आवळल्या असुन संशयीताकडुन ३ गावठी कट्टे व सहा जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे.
शिरपूर तालुक्यातील सत्रासेन-भोईटी मार्गवरून एका वाहनातून शस्त्र तस्करी होत असल्याची माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुरेश सिरसाळ यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. गुरुवार १२ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक संदीप पाटील व कर्मचाऱ्यांनी भोईटी-सत्रासेन नाकाबंदी केल्यानंतर संशयित वाहन ( एम.एच १५ टी.सी.५६८८) आल्यानंतर पोलिसांनी इशारा केल्यानंतर वाहन चालकांना थांबवल्याने संशयित वाढला व पोलिसांनी पाठलाअंती वाहन आठवत झडती घेतली असतात त्यातील सहा तरुणांकडे ७५ हजार रुपये किंमतीचे ३ गावठी कट्टे किंमतीचे मॅगझिन , सहा हजार रुपये किंमतीचे सहा जिवंत काडतुस, एक लाख ८० हजार रुपये किंमतीचे ७ मोबाईल, तसेच ५ लाख रुपये किंमतीची चारचाकी जप्त करण्यात आला.
संशयित आरोपी मोहित राम तेजवानी ( वय-२१) रा. गोदावरी कॉम्प्लेक्स चिंचवड पंचवटी नाशिक, आकाश विलास जाधव ( वय-२४) रा. देह मंदिर सोसायटी विसे चौक गंगापूर रोड नाशिक, राज प्रल्हाद मंदुरिया ( वय-२१) रा.आव्हाड निवास मधुबन कॉलनी पंचवटी नाशिक, अजय जेठा बोरीस ( वय-२९) रा. चैतन्य हाउसिंग सोसायटी रामवाडी पंचवटी नाशिक, श्रीनिवास सुरेंद्र कानडे (वय-२४) रा. दर्शन सोसायटी, विसे मळा कॉलेज रोड नाशिक, दर्शन चमनलाल सिंधी ( वय-२१) रा.होळनाथे, अजंदे बुद्रुक, ता. शिरपु या आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पो.उ.नि संदीप पाटील करीत आहे.