छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवल्यातील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्त्यांची प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती*
*छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवल्यातील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्त्यांची प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती*
*येवला तालुक्यातील तीन इतर जिल्हा मार्ग व तीन ग्रामीण मार्ग रस्ते सार्वजानिक बांधकाम विभागाकडे वर्ग*
*नाशिक,येवला,दि.१३ जानेवारी :-* राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला तालुक्यातील ६ इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्त्यांची प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती करण्यात आली असुन ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे येवला तालुक्यातील २९.५०० किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या सुधारणेसाठी सार्वजानिक बांधकाम विभागाकडून निधी प्राप्त होऊन या रस्त्यांना झळाळी मिळणार आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना दळणवळणाच्या जलद सुविधा उपलब्ध होतील.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून येवला तालुक्यातील राज्य महामार्ग ७५२ जी पासून मनमाड येवला महामार्ग ते गोरखनगर विखरणी-कानडी-पाटोदा-दहेगाव-धामोरऊळके-मुखेड फाटा सत्यागाव ते धामोरी हद्द रस्ता या रस्त्याची प्रमुख जिल्हा मार्ग म्हणुन दर्जोन्नती करण्यात आली आहे.इतर जिल्हा मार्ग १९३,१९४,३२ ग्रामीण मार्ग ८४,०१,१८५ या रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग १९५ हा नवीन क्रमांक प्राप्त झाला आहे. या सर्व रस्त्याची लांबी एकूण २९.५०० किलोमीटर इतकी आहे. या रस्त्याची दर्जोन्नती झाल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजानिक बांधकाम विभागाकडून निधी प्राप्त होणार असून या रस्त्याला झळाळी मिळणार आहे.