लान्सनायक सुरज चौबे यांच्यावर चांदवड येथे शासकीय इथमामात अंत्यसंस्कार*
लान्सनायक सुरज चौबे यांच्यावर चांदवड येथे शासकीय इथमामात अंत्यसंस्कार*

*लान्सनायक सुरज चौबे यांच्यावर चांदवड येथे शासकीय इथमामात अंत्यसंस्कार*
चांदवड शहरातील रहिवासी व लष्करी जवान लान्सनायक कै..सुरेश उल्हास चौबे यांचे चंदीगड येथील रुग्णालयात अचानक प्रकृती बिघडल्याने दाखल करण्यात आले होते त्यांना कावीळचा त्रास झाला रक्तात कावीळ उतरल्याने शेवटी डॉक्टरांचे शर्तीचे प्रयत्न अपयशी ठरले व उपचार सुरू असतानाच मंगळवारी रात्री त्यांचे निधन झाले.
त्यांचे पार्थिव पुणे येथून सकाळी चांदवड येथे त्यांचे राहते घरी आणण्यात आले त्यांचे राहते घरापासून अंत्ययात्रा सुरू होऊन वरचे गाव लोहार गल्ली, रंगमहाल, श्रीराम रोड, सोमवार पेठ मार्गे पेट्रोल पंपावरून पुढे मार्गस्थ झाली.
या अंतयात्रेत मोठ्या प्रमाणात युवक वर्ग तसेच चांदवड व परिसरातील नागरिक, सुरज चौबे यांचे मित्रपरिवार, नातेवाईक उपस्थित होते.
यावेळी सुरज चौबे अमर रहे
भारत माता की जय
वंदे मातरम अशा घोषणा परिसरात परिसर दुमदुमून गेला होता.
रस्त्यावर नागरिकांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी केली.
यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री सौ भारतीताई पवार, डॉ. आत्माराम कुंभार्डे, संजय जाधव, नितीन आहेर, भूषण कासलीवाल, अशोक काका व्यवहारे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.