जि.प.शाळा झेनफळे वस्ती शाळेतील मुलांना स्वेटर वाटप

जि.प.शाळा झेनफळे वस्ती शाळेतील मुलांना स्वेटर वाटप….
मनोहर देसले [ निफाड तालुका ] यास कडून….
आज दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झेनफळे वस्ती येथील मुलांना स्वेटर वाटप करण्यात आले, सामाजिक बांधिलकी जपणारे समाजाविषयी आपुलकी व प्रेम जिव्हाळा असणाऱ्या नाशिकच्या समाजसेविका सौ.सविताताई म्हस्के व राम भाऊ म्हस्के यांनी मुलांसाठी ही भेट दिलेली आहे, थंडीत अशी उबदार भेट मिळाल्यामुळे मुलं खूप खुश आहेत व सविताताई व रामभाऊंचे मनःपूर्वक आभार. स्वेटर वाटप प्रसंगी चिंचखेड गावातील मान्यवर श्री शिवानंद भाऊ संधान शाळेचे SMC अध्यक्ष श्री. आनंदा भाऊ फुगट, मा. सदस्य श्री. गोरख भाऊ तागडे श्री. दिलीप घिसाडे, श्री. कैलास मातेरे या मान्यवरांचा उपस्थित स्वेटर वाटप करण्यात आले या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती दिपाली कुमावत मॅडम आणि सह शिक्षिका प्रतिभाताई जाधव यादेखील उपस्थित होत्या.गटशिक्षणाधिकारी मा.कनोज साहेब, जोपुळ केंद्राचे विस्तार अधिकारी मा.वंदना चव्हाण मॅडम व केंद्रप्रमुख मा. दादासाहेब ठाकरे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
व भेट देणार्यांचे आभार मानले आहेत.