चाळीसगाव महाविद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी*
_*चाळीसगाव महाविद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी*
प्रतिनिधी शाहिद खान
चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी. पी. आर्ट्स एस. एम. ए. सायन्स अँड के. के. सी. कॉमर्स कॉलेज आणि के. आर. कोतकर ज्युनिअर कॉलेज चाळीसगाव मध्ये राजमाता जिजाऊ यांची जयंती आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . एम. व्ही. बिल्दीकर, उपप्राचार्य डॉ अजय काटे उपप्राचार्य बी. आर. येवले व कार्यक्रम समिती प्रमुख प्रा.
एस. वाय. पवार यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी आपले विचार मांडताना प्राचार्य बिल्दीकर यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवन आणि कार्यावर प्रकाश टाकला.
राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारामुळेच छत्रपती शिवाजीराजे घडले .
कर्तृत्ववान, संस्कारमुर्ती, शौर्यवान, लढाऊ बाण्याच्या आऊ साहेब राजमाता जिजाऊ यांनी शूर शिवबाना घडविले जे पुढे स्वराज्याचे निर्माते झाले खऱ्या अर्थाने त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केले.
अशा थोर महापुरुषांचे विचार अंगीकारले पाहिजेत. त्यांच्या जीवन कार्याचा आदर्श घ्यावा.
पराक्रमी पुरुष संस्कारी आई घडवीत असते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जिजाऊ आणि छत्रपती शिवराय होत. राष्ट्रातीलच नव्हे तर जगातील युवकांचे प्रेरणास्थान असलेले स्वामी विवेकानंद यांचेही विचार राष्ट्राला पुढे घेऊन जाणारे आहेत याकडे लक्ष वेधले.
याप्रसंगी विविध सत्कारही करण्यात आले.
महाविद्यालय विकास समिती (CDC)च्या सदस्यपदी महाविद्यालय शिक्षक प्रतिनिधी प्रा. एम. ओ. अहिरे, प्रा. डॉ. ए. बी. सावरकर, सौ . प्रा. एस . ए. जगताप तर प्राचार्य नामनिर्देशित विभागप्रमुख मधून प्रा. आर. आर. बोरसे यांची तर वरिष्ठ महाविद्यालयीन कर्मचारी प्रतिनिधी म्हणून श्री सतीश देसले श्री. अभिजित गायकवाड यांची तर
विविध विभाग प्रमुखपदी सौ .प्रा. एस. ए. जगताप प्रा. डी . एन. उंदिरवाडे प्रा . एम. एस . पाटील व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक प्रतिनिधी म्हणून
प्रा रमण घेटे यांची नियुक्ती झाल्या बद्दल सर्वांचे सत्कार करण्यात आले.
क.ब. चौ. उ.म. वि. अर्थशास्त्र बी ओ एस सदस्यपदी उपप्राचार्य डॉ अजय काटे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार सौ. प्रा. वैशाली पाटील यांनी केले.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.