५०वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात एम.एस.जी.एस. ला प्रथम क्रमांक..*

*५०वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात एम.एस.जी.एस. ला प्रथम क्रमांक..*
अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्राथमिक विद्यार्थी गटात प्रथम क्रमांक व सेमी इंग्लिश स्कूलचे माध्यमिक शिक्षक गटात प्रथम क्रमांक. यात इंग्लिश मिडीयम इ.५वी चे संस्कृती निलेश आहेर व माधव गणेश ढोले यांनी शिक्षक अर्चना एंडाईत यांच्या मार्गदर्शनाखाली *एम.एस.जी.एस. इझी मॅथस ट्रिक्स* मॉडेल तयार केले होते या विद्यार्थी मॉडेलने एकूण ४१ मॉडेल्स पैकी प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच सेमी इंग्लिश मिडीयमच्या शिक्षिका रेणुका भागवत यांनी मॅथेमॅटीकल मॉडेल्स तयार केले होते व या मॉडेलने एकूण १४ माध्यमिक शिक्षक मॉडेल्स पैकी प्रथम क्रमांक पटकावला.
बक्षीस वितरण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नाशिक जिल्हा परिषद च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती.अशिमा मित्तल, पंचायत समिती येवलाचे गटविकास अधिकारी श्री. अन्सार शेख, आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष श्री.हनुमंत भोंगळे हे होते.
विद्यार्थ्यांच्या व शिक्षकाच्या या यशाबद्दल अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे, उपाध्यक्ष सुदाम सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, संचालक राजेंद्र गायकवाड, मयुर सोनवणे, जीवन गाडे, उज्वल जाधव, राजेंद्र सोनवणे, लक्ष्मण सोनवणे, डॉ.भागीनाथ जाधव, आकाश सोनवणे, जनार्दन जानराव, संगीताताई सोनवणे, इंग्लिश मिडीयमचे प्रिन्सिपल अल्ताफ खान, कॉलेजचे प्राचार्य सचिन सोनवणे, सेमीच्या मुख्याध्यापिका जयश्री परदेशी,
अमोल आहेर, सुनील सपकाळ, अजहर खतीब, दीपक खैरनार, प्रशांत बिवाल, सागर गाडेकर, गणेश सोनवणे, शिवप्रसाद शिरसाठ, जितेश व्यवहारे, अजीम पटेल, महेश मेहेत्रे, गौरव सैंदाने, सचिन बोढरे, माधुरी माळी,सुषमा सोनवणे, नीलिमा देशमुख, शर्मिला पवार, सुनीता वडे, चेतना माकूने, सुश्मिता देशमुख, आलिया खान,अपर्णा लक्कड़कोट,प्रतीक्षा चव्हाण सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.