हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचे छापे; कार्यकर्त्यांची ईडीविरोधात घोषणाबाजी चालू….
हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचे छापे; कार्यकर्त्यांची ईडीविरोधात घोषणाबाजी चालू….
राज्याचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कागल येथील घरावर ईडीने आज सकाळी छापे मारले आहेत. यावेळी मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाजवळ गर्दी केली असुन ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या अशिकाऱ्यांसोबत प्राप्तिकर विभागाचे देखील अधिकारी असल्याची माहिती आहे. सध्या या अधिकाऱ्यांकडून यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी करत आहेत. कागल सोबतच मुश्रीफ यांच्या पुण्यातील नातेवाईकांच्या घरावर तसेच ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर देखील छापेमारी झाली आहे.
कोल्हापुरातील गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात येत असून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याबद्दलचे आरोप केले होते. दरम्यान मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र या कारवाईला विरोध करत आम्ही अधिकाऱ्यांना जाब विचारणार असल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे तेथे एकच गोंधळ उडाला असून धक्काबुक्की सुरु झाली आहे. त्यामुळे या परिसरामध्ये पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. पोलीस कार्यकर्त्यांना आवार घालण्याचा प्रयत्न होत आहे.