
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका जि.सांगली
सफाई कामगारांच्या न्याय हक्कासाठी महानगरपालिकेत बैठक
संघटनेचे राज्यस्तरीय नेते सांगलीत येणार..
वादळी चर्चा होण्याची शक्यता…
बाळासाहेबांची शिवसेनेचे
मा. मुकेश सारवान साहेब
यांचे खंबीर नेतृत्वातील शिवराज्य सफाई कर्मचारी सेनेच्या आग्रही मागणीवरून सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका मधील सफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न व मागण्यां संदर्भात मंगळवार दि.१०/०१/२०२३ रोजी बैठक होत आहे.
सफाई कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी शासन निर्णयांची नियमानुसार अंमलबजावणी व्हावी याकरिता संघटनेने वेळोवेळी निवेदने दिलेली आहेत.
त्याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असलेने संघटनेने प्रशासना सोबत बैठका, धरणे आंदोलन, आमरण उपोषण करून महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
संघटनेच्या आग्रही मागणीवरून मंगळवारी बैठक होत आहे.
बैठकीमध्ये संघटना सफाई कामगारांच्या मागण्यां व प्रलंबित प्रश्न प्रभावीपणे मांडणार असून प्रशासनाने त्यास प्रतिसाद न दिलेस सदर बैठक वादळी होण्याची शक्यता आहे.
श्री.रमेश लाड
जिल्हा अध्यक्ष
शिवराज्य सफाई कर्मचारी सेना सांगली जिल्हा.