ताज्या घडामोडी
भडगावात शिक्षकाकडे धाडसी घरफोडी; ४५ हजारांचा ऐवज लंपास
भडगावात शिक्षकाकडे धाडसी घरफोडी; ४५ हजारांचा ऐवज लंपास
प्रतिनिधी शाहिद खान
भडगाव शहरातील कोठडी रोड भागातील शिक्षकाचे बंद घर फोडून चोरट्यांनी ४५ हजारांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यानेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील कोठडील रोड भागात शिक्षक शरद माधवराव पाटील, (वय-५१) हे कुटुंबासह वास्तव्याला आहेत. पाटील कुटुंब कामानिमित्त बाहेरगावी गेल्याची संधी चोरट्यांनी साधली. चोरट्यांनी दरवाजा कडे कोंडा तोडून २५ हजार किंमतीचे दागिने व २० हजारांचा रोकड मिळुन ४५ हजारांचा ऐवज लांबवला . पुढील तपास सहायक निरीक्षक चंद्रसेन पालकर करीत आहे