पोलीस हवालदारासह मित्राला मारहाण ; एकाला ताब्यात

पोलीस हवालदारासह मित्राला मारहाण ; एकाला ताब्यात
प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावातील राकेश हॉटेलात पोलीस हवलदारासह मित्राला काहीही कारण नसतांना तीन जणांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत सोमवारी ९ जानेवारी रोजी रात्री १० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हातील एक संशयिताला एमआयडीसी पोलिसांना अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की मिर्झा मोहम्मद इसराल हिमायू बेग ( वय- ३८) रा. जामनेर जि. जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोयगाव पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार नोकरीवर आहेत. सोमवारी ९ जानेवारी मिर्झा बेग हे त्यांचे मित्र सलीम शेख, रा. जामनेर यांच्यासोबत दुचाकीने जळगावला खाजगी कामासाठी आले होते. काम आटोपून पुन्हा दुचाकी मित्रासोबत जामनेरला जाण्यासाठी निघाले. जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावातील राकेश हॉटेल येथे सायंकाळी ५:३० वाजता जेवण करण्यासाठी थांबले. त्यावेळी हॉटेलला तीन जणांना त्यांच्या मित्र सलीम शेख याला काहीही कारण नसतांना मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी मिर्झा बेघे गेले असता त्यांनी देखील मारहाण केली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे तिघांनी नावे निष्पन्न झाले. यात संशयित आरोपी आकाश विश्वे, रा. सुप्रीम कॉलनी, सुनील सुभाष साळवे, रा. पळासखेडा ता. जळगाव, आणि सुनील सोनार, या तिघां विरोधात सोमवारी ९ जानेवारी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी सुनील सुभाष साळवे याला मंगळवारी १० जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता अटक करण्यात आली आहे.