उदयसिंग आण्णा सोसायटीत सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरात 46 हजाराची चोरी

उदयसिंग आण्णा सोसायटीत सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरात 46 हजाराची चोरी
प्रतिनिधी शाहिद खान
चाळीसगाव – शहरातील धुळे रोडस्थित उदयसिंग आण्णा सोसायटीत सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरातील 40 हजार रुपये रोख व 6 हजार रुपये किमतीचे 2 ग्रॅम सोन्याचे पण असा एकूण 46 हजाराचा ऐवज चोरून नेल्याची घटना दि दिनांक 3/1/2023 रोजी दुपारी 3-30 ते दिनांक 8/1/2023 रोजी रात्री 8 वाजेच्या दरम्यान घडली असून चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, सौ विमलबाई अमरसिंग पाटील वय 72 धंदा घरकाम रा. उदयसिंग अण्णा सोसायटी, धुळे रोड, चाळीसगाव यांनी फिर्याद दिली की त्या व त्यांचे पती नाशिक येथे दिनांक 03/01/2023 रोजी कामानिमीत्त मुलाकडे गेले असता दि 8/1/2023 रोजी रात्री 8 वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे मागच्या
दाराचे लोखंडी कुलुप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील लोंखडी कपाट तसेच लाकडी कपाटाचे लॉकर तोडून त्यातील
6000 रुपये किमतीचे 2 ग्रॅम वजनाची सोन्याची ओमपान (पँडल) व
40,000 रुपये रोख चोरून नेल्याची फिर्याद चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन ला दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस नाईक भुषण पाटील करीत आहेत.