कुंभोज हिंगणगाव रोडवरील एअरटेल फायजी केबल खुदाईमुळे नागरिकांचा जीव धोक्यात

कुंभोज हिंगणगाव रोडवरील एअरटेल फायजी केबल खुदाईमुळे नागरिकांचा जीव धोक्यात
हातकणंगले तालुका प्रतिनिधी राहुल घोलप
कुंभोज ते हिंगणगाव जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एअरटेल कंपनीचे फायजी नेटवर्क कनेक्शन नेण्यासाठी दुर्गेवाडी हद्दीमध्ये व कुंभोज हद्दीमध्ये खुदाई काम करण्यात आले आहे तथापि हे काम गेली बरेच दिवस झाले बंद पडले आहे रस्त्याच्या साईड पट्टीला खुदाई काम केल्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे रात्रीच्या वेळी एखादा ट्रॅक्टर किंवा मोठे वाहन खुदाई केलेल्या ठिकाणाजवळ आले तर रस्त्याच्या कडेला उतरावयाचे झाले असता जीवाशी खेळणे असा प्रकार होऊ शकतो हे काम कोणत्या कॉन्ट्रॅक्टरने घेतले आहे त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे परिणामी आत्ता चालू असलेला ऊसतोड सीजन त्यामुळे ट्रक ट्रॉली यांचीही रहदारी या रस्त्याला खूप आहे तसेच दुर्गेवाडी हद्दीमधील काँक्रीट केलेला रस्ता देखील खुदाई करून टाकला आहे जो काही रस्ता खुदाई केला आहे त्या ठिकाणी खुदाई केलेली चर भर करून येण्या जाण्यासाठी मार्ग मोकळा करावा गेली कित्येक दिवस झाले या रस्त्याच्या समोर खुदाई केल्या करणे रस्ता बंद अवस्थेत आहे तरी याकडे का दुर्लक्ष होता तरी दुर्गेवाडी ग्रामपंचायत तिने लक्ष द्यावे अशी नागरिकांच्या कडून मागणी होत आहे एखाद्या वेळी ट्राफिक झाल्यास रस्त्याच्या किंवा अचानक एखादा चालक रस्त्याच्या साईट पट्टी उतरल्यास मोठा धोका होऊ शकतो व जीवांशी मुकु शकतो तरी याला जबाबदार कोण असा प्रश्न वाहनधारकांच्या कडून व परिसरातील नागरिकांच्या कडून करण्यात येत आहे तरी या रस्त्याची साईट पट्टी लवकरात लवकर मुजवून घ्यावी अशी मागणी वाहनधारक व नागरिकांच्याकडून होत आहे