जळगाव गुन्हे शाखेची मोठी कारवाई; पावणेतीन लाखांच्या गुटख्यासह आरोपी जाळ्यात
जळगाव गुन्हे शाखेची मोठी कारवाई; पावणेतीन लाखांच्या गुटख्यासह आरोपी जाळ्यात
प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव जिल्हा मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी सुरू असतानाच जळगाव गुन्हे शाखेने गोपनीय माहितीवरून कारमधून वाहतूक होणार पावणेतीन लाखांच्या गुटखा जप्त करीत एका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बुधवार ४ जानेवारी रोजी सायंकाळी ४:२० वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगाव शहरातील तांबापुरा येथील शेख इमरान शेख जहुरोद्दीन हा चार चाकी ( एमएच १९ ए.एक्स ३५१०) मधून जळगाव ते भुसावळ महामार्गाने मोठ्या प्रमाणावर गुटख्याची वाहतूक करीत असल्याची गोपनी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक गणेश चौबे, सहायक फौजदार शेख युनुस इब्राहिम, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील, प्रमोद ठाकूर, यांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी ४:२० वाजेच्या जळगाव भुसावळ महामार्ग वर टोलनाच्या जवळ आपला रचला.
मिळालेली माहितीनुसार संबंधित क्रमकांची कार आल्यावर तिची तपासणी केली असता, कार मधून दोन लाख ७५ हजार २६४ रुपयांचा विमल पान मसाला व तंबाखू मिळून आला. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने अन्न औषधी विभागाचे माध्यमातून कारवाई करत या प्रकरणी शेख इमरान शेख जवलुद्दीन यांच्याविरोधात गुरुवारी नशिराबाद पोलीस सात गुन्हा दाखल करण्यात आला