नीलकमल हॉस्पिटल मधुन महिलेचा मोबाईल लांबविला
नीलकमल हॉस्पिटल मधुन महिलेचा मोबाईल लांबविला
प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव शहरातील पंचमुखी हनुमान चौकातील नीलकमल हॉस्पिटल येथे महिलेच्या मोबाईल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.
या प्रकरणी बुधवारी ४ जानेवारी रोजी रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की सुनीता सुरेश मोरे ( वय-६०) रा. कांचन नगर जळगाव या महिला पंचमुखी हनुमान चौकातून नीलकमल हॉस्पिटल येथे खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात १ जानेवारी रोजी रात्री साडेबारा ते तीन महिन्याच्या दरम्यान ड्युटीवर असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या मालकीचा ३. हजार रुपये किंमतीच्या मोबाईल चोरुन नेला. त्यांनी मोबाईल कुठेही मिळून आला नाही. अखेर बुधवारी ४ जानेवारी रोजी रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हे.कॉ सचिन मुंढे करीत आहे.