महाराष्ट्र पोलीस स्थापना दिननिमित् _*जळगाव जिल्हा पोलीस दल, भंवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांचा संयुक्त उपक्रम*_
*महाराष्ट्र पोलीस स्थापना दिननिमित्
_*जळगाव जिल्हा पोलीस दल, भंवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांचा संयुक्त उपक्रम*_
प्रतिनिधी शाहिद खान
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त जळगाव जिल्हा पोलीस दल, भंवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यरत्नावली चौक जळगाव येथे बुधवारी शस्त्र, श्वान, बॉम्ब शोधक व नाशक, पोलीस बॅन्ड, वायरलेस इत्यादींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी 10.30 वाजता हवेत तिरंगे फुगे जिल्हाधिकारी अमन मित्तल, पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांचे हस्ते सोडून करण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उप अधीक्षक (गृह) संदीप गावित, युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया आदी मान्यवर उपस्थित होते.
विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते. यासह एन.सी.सी. व एन.एस.एस. चे कॅडेट सुद्धा उपस्थित होते. जिल्हाधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. चंद्रकांत गवळी यांनी प्रास्ताविक करून महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाचा इतिहास मांडला तर आभार प्रदर्शन संदीप गावित यांनी केले. युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया यांनी आयोजना मागची भूमिका स्पष्ट केली.
पोलीस विभाग व नागरिकांमध्ये सम्न्वय व संवाद वाढावा तसेच विद्यार्थ्यांना पोलीस विभागातातील संपूर्ण माहिती मिळावी यासाठी आयोजन केल्याचे कावडीया यांनी सांगितले. सूत्रसंचालन अमीत माळी यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाला जळगाव शहरातील सर्व पाेलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, रामकृष्ण कुंभार, विजयकुमार ठाकूरवाड, किशोर पवार, दिलीप भागवत, शिल्पा पाटील उपस्थित हाेते.
*प्रदर्शनात एके 47,* एसएलआर रायफल, कारबाईन 9एमएम, अश्रुधूर साठा, पम्प एक्शन , 9 एमएम पिस्टल, ग्लॉक पिस्टल, रिव्हॉलर, श्वान पथकातील डाॅबरमॅन व लॅबेडर प्रजातीचे श्वान, वायरलेस प्रणाली, दंगानियंत्रण पथकातील कमांडो, इन्सास रायफल आदी पोलीस हाताळत असलेले शस्त्र व यंत्रणेचे प्रदर्शनात समावेश हाेते.
*कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी* आरपीआय संतोष सोनवणे, आरएसआय मंगल पवार, ड्रील इन्स्ट्रक्टर देविदास वाघ, डी.वाय. मराठे, दिपक पाटील, हरीष कोळी, राजेंद्र वाघ, किरण सपकाळे, पीएसआय अमाेल कवडे, युवाशक्ती फाऊंडेशनचे अमित जगताप, प्रितम शिंदे, प्रशांत वाणी, सयाजी जाधव, भटु अग्रवाल, उमाकांत जाधव, निरंजन पाटील, संदीप सुर्यवंशी, सौरभ कुलकर्णी, दिनेश पाटील, राहुल चव्हाण, शिवम महाजन आदींनी परिश्रम घेतले.