खुनाचे गुन्ह्यातील फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या अटक
खुनाचे गुन्ह्यातील फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या अटक
प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव शहरात खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. विजय सिंग फुलसिंग पारधी रा. जैनाबाद जळगाव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
गुन्हा घडल्यापासून विजयसिंह उर्फ विजू पारधी हा फरार होता. विजू पारधी हा त्याच्या घरी जैनाबाद येथे आला असल्याची गोपनी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजन पाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्याला जेना बात परिसरातील विठ्ठल मंदिराच्या मागे असलेल्या पुलाजवळून अटक करण्यात आली. पुढील तपास कामी त्याला जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांचे पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश चौबे, हे.का विजयसिंह पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, पो.ना विजय पाटील, नितीन बाविस्कर, अविनाश देवरे, प्रीतम पाटील, सचिन महाजन, ईश्वर पाटील, आदिंसह जळगाव शहर पोलीस स्टेशनचे हे.का संजय भांडारकर, पो.का रतन गीते आदींनी या तपास कामी सहभाग घेतला.