स्वामी मुक्तानंद विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती व बी. बी. फणसे पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न :

स्वामी मुक्तानंद विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती व बी. बी. फणसे पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न :–
सचिन वखारे
येवला येथील श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी मुक्तानंद विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व संस्थेचे तत्कालीन चेअरमन डॉ. बी. बी. फणसे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ संचालक दिपक गायकवाड होते. याप्रसंगी दीपिका कुक्कर, सुषमा नागडेकर, सचिव संजय नागडेकर, अध्यक्ष डॉ. अमृत पहिलवान ,जेष्ट संचालक दिपक गायकवाड यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व डॉ. बी. बी.फणसे यांच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मनोहर कदम यांनी केले.कार्यक्रमाला संचालिका शकुंतला पहिलवान, शशिकला फणसे, दत्तात्रय नागडेकर, सभासद तेजस गायकवाड, प्रविण नागडेकर,डॉ. धनराज गोस्वामी, अंबादास ढोले, पर्यवेक्षक सुरेश मोहिते, ज्ञानेश्वर भागवत, राजेंद्र सोनवणे यांसह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रसाद कुळकर्णी यांनी तर आभारप्रदर्शन ज्योती फणसे यांनी केले.