स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन*
*स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन*
आज सावित्रीबाई फुले यांची जयंती असल्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते शहरातील नाट्यगृहासमोरील पुतळ्याजवळ जमा झाले व पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे व ज्येष्ठ नेते सुरेश खळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी सावित्रीबाई फुले यांचा विजय असो महात्मा फुले यांचा विजय असो असे म्हणत घोषणा देण्यात आल्या त्यानंतर प्रा. शरद शेजवळ यांनी गाण्याच्या माध्यमातून सावित्रीबाईंना फुले यांच्या जीवनावर गीत सादर केले तसेच सावित्रीबाई फुले यांचा जीवनातील त्या संघर्ष जिद्द चिकाटी तसेच रुढी परंपरा भेदाभेद समाजातील अनिष्ट प्रथा या सर्वांना पायदळी तुडवत महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना स्वतः शिकवून शिक्षणाची मुहूर्त मिळवली त्यांचा जीवन प्रवास अतिशय त्यागातून झाला असून आजच्या स्त्रियांनी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाज हितासाठी कार्य करावे तसेच गोरगरीब शोषित पीडित महिलांसाठी सुशिक्षित महीलांनी पुढे येणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन महेंद्र पगारे यांनी यावेळी बोलताना केले
यावेळी विजय घोडेराव अॅड.अनिल झाल्टे सुरेश खळे विनोद त्रिभवन अशोक पगारे विकास वाव्हुळ प्रशांत वाघ अतुल धिवर गोविंद पगारे राजरत्न वाव्हुळ यांच्या सह अनेक महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते