ताज्या घडामोडी
देश विदेशातूनही पतंग प्रेमी येवले शहरात दाखल होत असतात

येवले शहरात पतंग अत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी केवळ पर राज्यातून नव्हे तर देश विदेशातूनही पतंग प्रेमी येवले शहरात दाखल होत असतात
. या उत्सवासाठी चार महिने आधीपासूनच पतंग प्रेमी पूर्वतयारी करतात. अबाल वृद्धांसह केवळ लहान मुलंच नाही, तर महिला आणि मुली देखील या पतंग उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणावर भाग घेतात. या पार्श्वभूमीवर येवले शहरात पतंग उत्सवाची वातावरण निर्मिती व्हावी या उद्देशाने प्रसिद्ध व्यंगचित्रकार व सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर झळके सर यांनी १२ फूट उंचीचा पतंग बनवून शहराच्या मध्यवर्ती भागात मेनरोडवर लावला आहे.
त्यामुळे जाणार येणाऱ्यांची लक्ष वेधून घेत आहे.
सचिन वखारे, येवला