आज मध्यरात्री पासून महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी संपावर जाणार.!
आज मध्यरात्री पासून महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी संपावर जाणार.!
सुबोध सावंत -नवी मुंबई प्रतिनिधी
मुंबई :आज मध्यरात्री पासून महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी संपावर जाणार. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाला विरोध करण्यासाठी संप पुकारला आहे.
अदाणी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याचा हालचाली सुरु असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांचा 30 संघटनांनी संप पुकारला असून हा संप तीन दिनाचा राज्यव्यापी असेल.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. मागणी पूर्ण झाली नाही तर 3 दिवसानंतर हा संप पुढे देखील चालू राहील. तसेच या काळात वीजपुरवठा खंडित झाला तर त्याची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सरकारची असेल असे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
संप M.S.E.B 4 DEPT सर्व नागरिकांना कळविण्यात येते की महावितरण, महापारेशन व महानिर्मिती मधील सर्व कर्मचारी दिनांक – ०३/०१/२०२३ (रात्री १२.००) पासून पुढील ७२ तास संपामध्ये जात आहे त्यामुळे सर्व लोकांनी मोबाईल चार्जिंग / आणि Water Tank पाण्याची टाकी भरवून घेणे तसेच विजे संर्भातील विविध अत्यावश्यक कामे करून घेणे.