नवी मुंबई शहरातील घणसोली येथील सिम्प्लेक्स परिसरात भर दिवसा घरफोडी. वीस लाख साठ हजार चे सोने केले चोरट्याने लंपास.
नवी मुंबई शहरातील घणसोली येथील सिम्प्लेक्स परिसरात भर दिवसा घरफोडी. वीस लाख साठ हजार चे सोने केले चोरट्याने लंपास.
सुबोध सावंत – नवी मुंबई प्रतिनिधी.
नवी मुंबई शहरातील घणसोली येथील माथाडी वसाहत म्हणून ओळखल जाणारे सिम्प्लेक्स मध्ये काल दुपारी एक ते दोनच्या सुमारास श्री गणेश कृपा या सोसायटी मध्ये काही अज्ञात चोरट्यांनी घर फोडले.
सविस्तर बातमी अशी की श्री गणेश कृपा या सोसायटी मध्ये राहणारे श्री. बाबुराव लक्ष्मण मोरे ( वय वर्षे ५५ ) हे सकाळी कामावर गेले असता दुपारी त्यांच्या राहत्या घरी काही अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून जवळपास बेचाळीस ते पंचेचाळीस तोळे सोने व वीस हजार रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला . श्री. मोरे यांच्या पत्नी दोन दिवसांपूर्वी गावी गेल्या होत्या तसेच त्यांचा मुलगा दुकानावर गेला असता हा प्रकार घडला. सोसायटी परिसरात कॅमेरा दुरुस्तीचे काम चालू होते, त्यामुळे चोरट्यांचा मागोवा घेण्यास कठीण होणार आहे. घटनास्थळी पोलीसांनी पंचनामा करून गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास पोलीस सब इन्स्पेक्टर श्री. माने करीत आहेत.