राहते घर जमिनदोस्त, बौद्ध कुटुंब रस्त्यावर. ऍट्रॉसिटी ची
▪️राहते घर जमिनदोस्त, बौद्ध कुटुंब रस्त्यावर. ऍट्रॉसिटी ची..
▪️मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचा प्रताप..
सुबोध सावंत -नवी मुंबई प्रतिनिधी
मुंबई – गोणी नगर जोगेश्वरी परिसरात मागील 30″ वर्षांपासून वास्तव्यास असणाऱ्या बौद्ध कुटुंबाचे राहते घर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने जमीन दोस्त केल्याचा प्रकार घडला आहे.*
आंबेडकरि अनुयायी शशिकांत वाघमारेंच्या राहत्या घरावर शिवसेना वार्ड क्र. ७७ चे माजी नगरसेवक बाळा (भिकू) नर यांच्या तक्रारीहून म्हाडा च्या वतीने बुल्डोजर फिरवण्यात आला आहे.
शशिकांत वाघमारे यांचे २० वर्षापूर्वी पासून वास्तव्य असून त्या संबंधित पुरावे म्हाडाला सादर करूनही म्हाडा ने वाघमारे यांची बाजू मांडून न घेता त्यांना कोणतीही नोटीश ना बजावता अतिरेकी पणाने त्यांच्या घरावर बुल्डोजर चालवला आहे.
वाघमारे यांचे दोन्ही पायांचे आॕपरेशन झाले असून त्यांच्या मुलीचे बाळंतपण झालेले आहे व मुलीच्या जुळ्या मुलासह त्यांच्या कुटूंबाला बाळंतीणीला रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे.
वाघमारे यांच्या शेजारी भिंतीला चिटकूनच बांधलेला सज्जा व त्यावर पञे टाकण्यात आले आहे. व दुसऱ्या भिंतीला म्हाडाच्याच भागात शिवसेनेनेच बांधलेले आॕफिस आहे. म्हाडातील इतर अतिक्रमित भागांवर दुर्लक्ष करून शशिकांत वाघमारे यांना लक्ष करण्यामागे बाळा नर याची जातीय मानसिकता यातून दिसून येत असून तयाच्या ऍट्रॉसिटी ऍक्ट द्वारे कारवायीची मागणी केली आहे.
वंचित चे पदाधिकारी असलेले शशिकांत वाघमारे यांच्यावर जातीयवादातून हे संकट ओढवले असल्याचे बोलले जात आहे. वंचित चे जुने जाणते कार्यकर्ते वैजनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते घटनास्थळी दाखल होऊन बाळा नर यांच्या जातीय मानसिकतेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
यावेळी उद्धव तलवारे, चंद्रकांत घाडगे, भरत बेडगेकर, शारदा मोरे, पगारे गुरुजी, घायतडक, लालू कांबळे आदिसह शेकडो वंचित कार्यकर्ते व रिपाई डेमोक्रॅटिक चे डॉ. राजन माकणीकर उपस्तिथ होते.