ब्राम्हणेत्तर समाजाने मनुस्मृतीच्या मानसिक गुलामितून बाहेर पडावे. मा.राजेंद्र भोसले
ब्राम्हणेत्तर समाजाने मनुस्मृतीच्या मानसिक गुलामितून बाहेर पडावे.
मा.राजेंद्र भोसले
तालुका प्रतिनिधी राहुल घोलप
तालुकाध्यक्ष,भारतीय बौद्ध महासभा
कुंभोज-भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा हातकणंगलेच्या वतीने
२५ डिसेंबर रोजी मनुस्मृती दहन दिन
व
स्त्रि मूक्ती दिन
कुंभोज ता.हातकणंगले येथे साजरा करण्यात आला.
या वेळी तालुकाध्यक्ष राजेंद्र भोसले यांनी अध्यक्षपदावरुन आपले विचार मांडले,”आजही समाजाचा स्त्रीयांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला नाही.आजूनही स्त्री मानसिकदृष्ट्या मूक्त झाली नाही.याचे महत्वाचे कारण म्हणजे मनुस्मृतीनं लादलेली गुलामी आहे.जोपर्यंत या जोखडातून ब्राम्हणेत्तर समाज बाहेर पडत नाही तो पर्यंत आपल्या देशात खय्राअर्थाने स्वातंत्र्य,समता व बंधुभाव नांदणार नाहीत”.
यावेळी भारतीय बौध्द महासभेच्या जिल्हा सचिवा मा.मनिषाताई कुरणे,समता सैनिक दलाचे जिल्हा उपाध्यक्ष मा.संदिप घोलप,केंद्रीय शिक्षीका , मा.बबिता घोलप ,वंचितचे मा.अरुण जमने,मा.गणपती कोले यांनीही आपले विचार मांडले.
यावेळी मा.संगिता कांबळे,रुकडी यांची हातकणंगले तालुका विभागीय महिला अध्यक्षा दक्षिण व
मा.अस्मिता घोलप यांची
विभागिय तालुकाध्यक्षा हातकणंगले उत्तर .अशी नेमणूक करणेत आली.
कार्यक्रमाचे उदघाटन ग्रा.पंं.सदस्या, कुंभोज मा.पौर्णिमा भोसले यांच्या हस्ते झाले व दिपप्रज्वलन रेश्मा गायकवाड,ग्रा.पं. सदस्या हिंगणगांव यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तालुका सरचिटणीस मा.प्रभाकर कांबळे यांनी केले
संघटक मा.अॅड.दिनेश घोलप यांनी प्रास्ताविक केले तर आभार पर्यटन उपाध्यक्ष मा.रमाकांत काकडे यांनी मानले.
सदर कार्यक्रम यशस्वी करणेसाठी मा.सुनिता जमणे,मा.जयश्री भोसले,मा.वैभव डोणे मा.बजरंग भोसले,मा.नानासो डोणे आदींनी परिश्रम घेतले