*महाराष्ट्र राज्य व उद्योग धोरण समितीची बैठक संपन्न* (येवला) महाराष्ट्र शासनाच्या सन 2023- 2028 करिता वस्त्र उद्योग धोरण समितीची बैठक नागपूर येथे मंगळवार दिनांक 27 डिसेंबर 2022 रोजी संपन्न झाली. या बैठकीला राज्याचे वस्त्रोद्योग आयुक्त पी शिवशंकर,राज्याचे रेशीम संचालनालयाचे संचालक व उपसंचालक, प्रादेशिक वस्त्रोद्योग उपायुक्त सोलापूर, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, लोकर संशोधन संस्थेचे प्रतिनिधी, महाराष्ट्र ऊर्जा विकास एजेन्सी MEDA प्रतिनिधी ,सुतगिरणी यंत्रमाग हातमाग प्रतिनिधी ,माननीय विधानसभा सदस्य प्रकाशआण्णा आवाडे,महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष श्री अशोक स्वामी भाजपा विणकर प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक शामजी चांदेकर, सहसंयोजक मनोज दिवटे,किशोर उमरेडकर, विष्णू करंडे,CMAI चे अंकुर गादिया, लक्ष्मीनारायण देवसानी आदी मान्यवर उपस्थित होते.माननीय वस्त्रोद्योग आयुक्त पी शिवशंकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.शेतीखालोखाल रोजगार उपलब्ध करून देणारा वस्रोद्योग व्यवसाय गेल्या काही वर्षापासून विविध कारणांनी आर्थिक संकटात सापडला आहे.नवीन वस्रोद्योग धोरणामध्ये कोणत्या बाबींचा समावेश केला जावा या संदर्भात प्राथमिक चर्चा करण्यासाठी नागपूर मध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती.हातमाग क्षेत्रातील सध्याची स्थिती मागील पंचवार्षिक वस्रउद्योग धोरणातील फलनिष्पत्ती व यापुढील वस्त्रोद्योग धोरणात अंतर्भुत करण्यात येणाऱ्या मुद्द्यांबाबत भारतीय जनता पार्टी वस्त्रोद्योग प्रकोष्ठचे प्रदेश सहसंयोजक मनोज दिवटे यांनी विविध मुद्दे मांडून सविस्तर चर्चा केली. 1)विणकरांना धागा खरेदी करणे करिता व उत्पादित झालेल्या मालाला योग्य दर मिळेपर्यंत साठवणूक क्षमता निर्माण करण्याकरिता शासनाने अत्यंत अल्प दराने किंवा कमीत कमी चार टक्के दराने वित्त पुरवठा करावा. 2) हातमाग धारकांना सोलर
Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR..AFAZAL Devalekar Sarkar Mumbai +919004737999
आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश
poicetimes.co.in
Related Articles

मा आ. श्री. छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य यांचा दि. २७ मार्च २०२३ रोजीचा दौरा कार्यक्रम
26/03/2023