महाराष्ट्र राज्य वस्रउद्योग धोरण समितीची बैठक संपन्न*

*महाराष्ट्र राज्य वस्रउद्योग धोरण समितीची बैठक संपन्न*
(येवला) महाराष्ट्र शासनाच्या सन 2023 2028 करिता वस्त्र उद्योग धोरण समितीची बैठक नागपूर येथे मंगळवार दिनांक 27 डिसेंबर 2022 रोजी संपन्न झाली. या बैठकीला राज्याचे वस्त्रोद्योग आयुक्त पी शिवशंकर, राज्याचे रेशीम संचालनालयाचे संचालक व उपसंचालक,प्रादेशिक वस्त्रोद्योग उपायुक्त सोलापूर, मुंबई, औरंगाबाद, सोलापूर, लोकर संशोधन संस्थेचे प्रतिनिधी, मेढाचे प्रतिनिधी,सुतगिरणी यंत्रमाग हातमाग प्रतिनिधी,माननीय विधानसभा सदस्य प्रकाशआण्णा आवाडे,महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष श्री अशोक स्वामी भाजपा विणकर प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक शामजी चांदेकर, सहसंयोजक मनोज दिवटे,किशोर उमरेडकर, विष्णू करंडे,CMAI चे अंकुर गादिया, लक्ष्मीनारायण देवसानी आदी मान्यवर उपस्थित होते.माननीय वस्त्रोद्योग आयुक्त पी शिवशंकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.हातमाग क्षेत्रातील सध्याची स्थिती मागील पंचवार्षिक वस्रउद्योग धोरणातील फलनिष्पत्ती व यापुढील वस्त्रोद्योग धोरणात अंतर्भुत करण्यात येणाऱ्या मुद्द्यांबाबत भारतीय जनता पार्टी वस्त्रोद्योग प्रकोष्ठचे प्रदेश सहसंयोजक मनोज दिवटे यांनी विविध मुद्दे मांडून सविस्तर चर्चा केली. 1)विणकरांना धागा खरेदी करणे करिता व उत्पादित झालेल्या मालाला योग्य दर मिळेपर्यंत साठवणूक क्षमता निर्माण करण्याकरिता शासनाने अत्यंत अल्प दराने किंवा कमीत कमी चार टक्के दराने वित्त पुरवठा करावा. 2) हातमाग धारकांना सोलर युनिट करिता स्वतंत्र योजना तयार करावी. 3) हातमागाचे आधुनिकीकरण करणे, विविध सामुग्रीच्या नूतनीकरण करण्याकरिता योजनांची आखणी करावी. 4)केंद्र सरकारच्या धागा खरेदीवरील सबसिडी योजना राज्याने देखील सुरू करावी. 5)हातमाग कामगारांच्या कल्याणाकरिता A)कामगार नोंदणी B)लेबर हॉस्पिटल C)कामगार पेन्शन योजना D) रुपये दहा लाखापर्यंत आरोग्य विमा योजना लागू करण्यात याव्या. 6)महाराष्ट्राचे वैभव असणाऱ्या हातमाग पैठणी क्षेत्राच्या ऊर्जितावस्थे करिता शासनाने जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या तीर्थक्षेत्र शिर्डी,कुंभमेळ्याचे पवित्र तीर्थक्षेत्र नाशिक,बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेले श्री क्षेत्र त्रंबकेश्वर व वेरूळ,आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शहर असलेले औरंगाबाद या सर्व शहरांच्या मध्यवर्ती असलेल्या येवला हे शहर येथे भव्य असे सिल्क पार्क उभारावे सिल्क पार्क मुळे येवला हे पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होईल प्रसिद्धी पावेल. 7))केंद्र व राज्य सरकारने संयुक्तपणे विनकारांना आवास व वर्क शेड योजना सुरू करावी. 8)महाराष्ट्र राज्य खादी महामंडळ सोबत हातमाग उत्पादित मालाला महाखादी दुकानांमध्ये विक्रीची व्यवस्था करून द्यावी. 9)दिल्ली येथील महाराष्ट्र भवन, महाराष्ट्र सदन तसेच देशभरातील इतर राज्यात महाराष्ट्र राज्याच्या मालकीची असलेल्या मोठमोठ्या सुप्रसिद्ध इमारतींमध्ये हातमाग उत्पादित मालाची विक्री केंद्र सुरू करण्यात यावी. 10)सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हातमागावरील उत्पादने विक्री व्यवस्था करण्याची किंवा उत्पादित मालाच्या जाहिराती करण्याकरता उत्पादित मालाच्या विक्री करीता गव्हर्मेंट वेबसाईटवर विक्री करण्याची व्यवस्था करावी याकरिता शासन स्तरावर प्रयत्न करण्यात यावे. 11)विणकरांना शासनाचे ओळखपत्र देण्याची तातडीने व्यवस्था करण्यात यावी. 12)त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये तुतीचे लागवड क्षेत्र वाढून उत्पादित कोषांवर प्रोसेसिंग युनिट्स निर्मिती केंद्रे त्याचप्रमाणे रंगनीगृहे उभारून कमीत कमी दरामध्ये रेशीम उपलब्ध करून द्यावे. 13) हातमाग उद्योगाशी संबंधित केन्द्र व राज्याची कार्यालये येवल्यात असावी याकरिता प्रयत्न करावे. याप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या सन 2023 2018 करिता तयार करण्यात येणाऱ्या वस्त्रोद्योग धोरणात वरील मुद्द्यांचा समावेश करण्यात यावा याकरिता श्री मनोज दिवटे यांनी नागपूर येथील बैठकीत हातमागप्रतिनिधी म्हणून वरील मुद्द्यांची सखोल चर्चा घडवून आणली.