ब्रह्मकुमारीज् तर्फे राष्ट्रीय किसान दिन साजरा
ब्रह्मकुमारीज् तर्फे राष्ट्रीय किसान दिन साजरा
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय येवला शाखेत 23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय किसान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्वप्रथम ईश्वरीय स्मृती व दीप प्रज्वलन करून सर्व प्रमुख पाहुण्यांना गुलदस्ता, शॉल, मानाचा फेटा, तिलक, नवीन वर्षाचे कॅलेंडर व ईश्वरीय स्मृतीचा प्रसाद देऊन सन्मानित करण्यात आले. भारताचे पाचवे पंतप्रधान माननीय श्री. चौधरी चरणसिंग यांच्या जन्मदिनानिमित्त हा 23 डिसेंबरचा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा करतात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजयोगिनी ब्रह्माकुमारी नीता दीदी यांनी केले. दक्षिण आफ्रिकेतील जॉर्ज वॉशिंग्टन तिसरे ( ज्यांच्या जीवन काळाचे वर्णन ” एक होता कार्व्हर” या पुस्तकात लेखकाने केले आहे) त्यांनी एकाच प्रकारचे पीक शेत जमिनीत न घेता आलटून पालटून पिक घेण्याचा सर्वप्रथम शोध लावला होता. भुईमुगाच्या शेंगदाण्याचे तेल कसे बनवायचे याचे संशोधन या वॉशिंग्टन यांनी केले होते. एक नाहीतर शेंगदाण्यापासून 144 प्रकारच्या खाद्यपदार्थांमधला वापर तसेच रताळ्यापासून 107 प्रकारच्या स्वयंपाक घर व औषधी उपयोग वस्तूंचा त्यांनी शोध लावला. शेतकरी हा वैज्ञानिक देखील असतो. माउंट आबू येथील ग्राम विकास विंगमार्फत शाश्वत योगी शेतीचे खूप सुंदर अनुभव देखील राजयोगिनी ब्रह्माकुमारी नीता दीदी यांनी प्रास्ताविकेत सांगितले. आधुनिक शेतकरी व शेती पूरक जोडधंदा करणारे व्यावसायिक श्री रमेश सोनवणे यांनी ब्रह्माकुमारी संस्थेचा परिचय दिला व स्वतःचे सुंदर अनुभव मांडून शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला. कार्यक्रमाचे उद्घाटक श्री वसंतराव पवार उपसरपंच भाटगाव तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती येवला चेअरमन हे होते. याप्रसंगी मंचावर दुगलगाव ग्रामपंचायत सरपंच श्री रावसाहेब लासुरे, कोटमगाव देवस्थानचे ट्रस्टी श्री भाऊसाहेब आदमाने, सामाजिक कार्यकर्ता श्री गोकुळ वाघ, अंकाई सरपंच सौ नगीना बाबूलाल कासलीवाल, माजी सरपंच श्री बाळासाहेब दाने देवदरी हे मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मंचावर उपस्थित असलेले श्री महेंद्र भाऊ पगारे फलोत्पादन अधिकारी कृषी विभाग यांनी प्रमुख वक्ता म्हणून भाषण केले व शेतकऱ्यांना किसान दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच शेतकऱ्यांना खूप सुंदर मार्गदर्शन केले.भाटगाव उपसरपंच यांनी प्रगत शेती विषयक विचार व्यक्त केले .याप्रसंगी श्री अलकेश बाबूलाल कासलीवाल व्यावसायिक, शिक्षक श्री गुलाबराव जगन राव सोनवणे अंदरसुल, प्रतिष्ठित शेतकरी माधव पवार भाटगाव, श्री गोपाळराव महाले सेवानिवृत्त व्याख्याते नगरसुल, श्री रामकृष्ण माधवराव महाले सेवानिवृत्त प्राथमिक आरोग्य केंद्र येवला, प्राथमिक शिक्षक गोकुळदास अरविंद वाघ, अभिनव बाल विकास मंदिर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुदर्शन जाधव सर, श्री पंडित शिवाजी अहिरे मालेगाव, चिलिया पंढरीनाथ भड येवला, पंढरीनाथ पुंडलिक वाळूज, श्री अशोक रघुनाथ जाधव बाबुळगाव, श्री बापू सुदाम गोरे अंगणगाव ,
सौ नर्मदा आहेर मालेगाव, सौ शारदा शरद पैठणकर अंदरसुल, जनाबाई गजराज गोसावी, श्री सुरेश किसन थोरे, श्री शिवाजी कारभारी जाधव, श्री रघुनाथ काशिनाथ कोटमे कोटमगाव, श्री गौतम गबाजी पगारे, श्री नामदेव वाळोबा मठवई , सौ प्रमिला शहारे, सौ विद्या छतानि हे सर्व शेतकरी व सेवेकरी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राज योगिनी ब्रह्मा कुमारी अनुदीदी यांनी केले