प्राण घातक नायलॉन मांजात ज्येष्ठ नागरिकाचा पाय अडकून पाय चिरले सुदैवाने मदतकार्य व उपचार झाल्याने प्राण वाचले.
पंचवटी –
प्राण घातक नायलॉन मांजात ज्येष्ठ नागरिकाचा पाय अडकून पाय चिरले
सुदैवाने मदतकार्य व उपचार झाल्याने प्राण वाचले.
नायलॉनचा मांजा खरेदी विक्री या दोन्ही प्रकारावर बंदीअसतानाही
काल(दि.27) दुपारी चार वाजेच्या सुमारास पंचवटी
रामसेतू पुलाजवळून पायी जाणारे मदनलाल भुतडा याज्येष्ठ
नागरिकाच्या पायात नायलॉनचा मांजा अडकून दोन्हीही पाय चिरले गेल्याने रक्तबंबाळ झाले.
मदनलाल भुतडा(वय67)(राहणार त्रंबकेश्वर) हे
पंचवटी गंगेवर दर्शना
साठी जात असताना अचानक त्यांच्या पायात नायलॉनचा मांजा अडकला त्यांना थोडावेळ काय झाले हेच समजेनासे झाल्याने ते खाली कोसळले तेथूनच स्मार्ट सिटीच्या बैठकीस जात असलेले इंदिरानगर विनयनगर येथील गर्जना युवा प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष प्रवीण जाधव यांनी ज्येष्ठ नागरिक रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून त्यांच्या पायातून मोठ्या प्रमाणात रक्त येत असल्याने त्यांनी त्वरित रुमाल बांधून रक्तस्त्राव थांबण्याचा प्रयत्न केला.
फक्त स्त्राव थांबत
नसल्याने मदतीसाठी हाका मारल्या परंतु कोणीच आले नाही.
ये जा करणाऱ्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली.
अखेर दोन युवक मदतीला धावून आले.
याच्या मदतीने या ज्येष्ठ नागरिक भुतडा बाबा यांना त्वरित रिक्सात घाळून गणेशवाडी
रुग्णालयात घेऊन गेले. तेथे प्राथमिक उपचार केले.पुढील उपचारार्थ
भूतडा यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.जखमी भुतडा यांच्या पायातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांना काही सुचत नसल्याने प्रवीण जाधव यांनी घडलेल्या घटनेचे छायाचित्र सोशल मीडियावर टाकल्याने त्यांचा त्र्यंबकेश्वर येथील पुतण्याने फोनवरून संपर्क साधला.
व सायंकाळी शासकीय रुग्णालयात दाखल झाला.यावेळी प्रवीण जाधव यांचे मदत कार्यामुळे काकाचे प्राण वाचल्याने त्यांचे आभार मानले.
कोट+फोटो
नायलॉनचा मांजा हा मुळात कुठे तयार होतो याच्या मुळापर्यंत जाऊन
या प्राण घातक मांज्यावर
बंदी आणावी.ज्याच्या
कडे सापडेल त्याला कडक शासन करावे
प्रवीण जाधव
गर्जना युवा प्रतिष्ठान विनयनगरचे संस्थापक, अध्यक्ष.