अयोध्या नगरात श्रद्धा रेसिडेन्सी या अपार्टमेंटमध्ये एकाच वेळी तीन ठिकाणी चोरट्यांनी मारला डल्ला
अयोध्या नगरात श्रद्धा रेसिडेन्सी या अपार्टमेंटमध्ये एकाच वेळी तीन ठिकाणी चोरट्यांनी मारल्या डल्ला
प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव शहरात अयोध्या नगरातील श्रध्दा रेसिडेन्सी या अपार्टमेंट मध्ये एकाचवेळी तीन ठिकाणी घरफोडी केल्याची घटना घडली. काच्या ग्रास एकूण तीन घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आता प्रवेश करत घरफोडी केल्याची घटना झाली होती.
३ लाख ५३ हजारच्या मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला. असुन त्यात १ लाख रुपयांसह सोन्या व चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे.
अधिक माहिती अशी की, श्रद्धा अपार्टमेंटमध्ये संजय गोरखनाथ सिंग हे खासगी सुरक्षा रक्षक परिसरासह राहतात. संजय सिंग यांची मुलगी सामान्य रुग्णालयात वैद्यकीय उपचार साठी दाखल आहे. २५ डिसेंबर रोजी रात्री साधारण पावणे नऊ वाजेच्या सुमारास संजय सिंग हे ड्युटीवर निघून गेले. त्यानंतर इतर सर्व सदस्य रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास घरी आले त्यावेळी हा प्रकार उघड झाला.
श्रद्धाअपार्टमेंटमधील रहिवासी अशोक कुमार विश्वकर्मा यांच्या घरात २४ हजार रुपये किमतीच्या ६ ग्राम वजनाचे मंगळसूत्र गायब झाले आहे. याशिवाय संतोष कुमार नगर यांच्या घरातून नेमका काय ऐवज गेला हे समजु शकले नाही.
संजय सिंग यांनी या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी साहेब पोलीस अधीकक्ष संदीप गावित, पो.नि जयपाल हिरे यांनी सदर गुन्ह्याचा आणण्याकामी सहायक पोलिस अधीक्षक संदीप गावित यांनी सुचेना दिल्या आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आनंद सिंग पाटील करीत आहे.