चाळीसगाव नेताजी चौकातील घरफोडी गुन्हा उघडकीस…. 7 लाख रुपयांची चोरी पैकी 5 लाख 97 हजार हस्तगत….
चाळीसगाव नेताजी चौकातील घरफोडी गुन्हा उघडकीस….
7 लाख रुपयांची चोरी पैकी 5 लाख 97 हजार हस्तगत….
चाळीसगाव पोलिसांची कामगिरी….
प्रतिनिधी शाहिद खान
चाळीसगाव शहरातील नेताजी चौकात दिनांक 22/12/2022 रोजी सकाळी 11.15 वा ते 12.00 वा. च्या दरम्यान महिला आपल्या घराचा समोरील दरवाजा आतून बंद करुन घराच्या बाजुच्या दरवाज्या जवळ आपल्या लहान नातुला बसवुन ती मसाले आणण्यासाठी घाटरोडवर गेली असता अंदाजे 25 ते 30 वयाच्या अंगात जिन्स व स्वेटर घातलेल्या दोन महिलांनी रिक्षाने नेताजी पालकर चौक याठिकाणी येवुन फिर्यादी यांच्या घरात प्रवेश करुन फिर्यादीने घरामध्ये बेडमध्ये एका पिशवीत ठेवलेले सात लाख रुपये दोन अनोळखी महिलांनी चोरुन नेले होते, त्यावरुन चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
गुन्हा घडल्यानंतर एम. राजकुमार पोलीस अधिक्षक जळगांव यांच्या आदेशान्वये रमेश चोपडे अपर पोलीस अधिक्षक चाळीसगांव परिमंडळ तसेच अभयसिंह देशमुख सहा. पोलीस अधिक्षक उप विभाग चाळीसगांव, पोलीस निरीक्षक के. के. पाटील, सपोनि, ढिकले, सपोनि. टकले, पोउनि आव्हाड, पोना. राहुल सोनवणे, पोना. पंढरीनाथ पवार, पोकॉ. निलेश पाटील, पोकों. विनोद खैरनार, पोकॉ. अमोल भोसले यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन फिर्यादी व साक्षीदार यांना सविस्तर विचारपुस करुन तसेच आरोपी महिला ज्या रिक्षाने घटनास्थळी आलेल्या होत्या त्या रिक्षा चालकाचा शोध घेवुन तसेच परिसरातील व छत्रपती शिवाजी महाराज चौक, रेल्वे स्टेशन सरस्वती हायस्कुल इत्यादी ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज चेक करुन तसेच धुळे – मालेगाव रोडवरील रिक्षा व टॅक्सी चालक यांना चोरी करणाऱ्या महीलांचे फुटेज दाखवुन व इतर तांत्रीक माहीतीच्या आधारे सदरचा गुन्हा उघडकीस आणला.
सीसीटीव्ही फुटेज व फिर्यादीने सांगीतलेली सविस्तर हकीकत व मिळालेल्या माहीतीवरुन सदर गुन्ह्यामध्ये आरोपी रविंद्र रघुनाथ गोसावी रा. ठाणगांव ता.सिन्नर ह.मु. नाशिक व त्याच्या सोबत नाशिक येथुन चोरी करण्यासाठी चाळीसगांव येथे आलेल्या दोन महिला आरोपी तसेच त्यांना मदत करणारी आरोपी रविंद्र रघुनाथ गोसावी याची पत्नी अशा चारही आरोपींना सदर गुन्ह्यामध्ये नाशिक व सिन्नर येथून ताब्यात घेवुन अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडुन चोरीस गेलेल्या 7,00,000/- रुपया पैकी 5,97,000/- रुपये जप्त करण्यात आलेले आहेत. सदर गुन्ह्याता पुढील तपास वरिष्ठांच्या मार्ग दर्शनाखाली पोउनि, सुहास आव्हाड तसेच गुन्हे शोध पथकाचे पोना / राहुल सोनवने, पोकों / अमोल भोसले, पोकॉ/विनोद खैरनार, पोका /शरद पाटील, मपोकों/सभा शेख असे करीत आहेत.