एमआयडीसी पोलिसांची मोठी कामगिरी

एमआयडीसी पोलिसांची मोठी कामगिरी
प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव शहरातील जी.एस ग्राउंड शासकीय तांत्रिक विद्यालयात कार्यालयाचे शटरचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्यांनी कार्यालयातील प्रवेश केला आणि २०.०००/ रु किंमतीच्या लिनोव्हा कंपनीच्या कंप्युटर व ५०००/ रु किंमतीच्या लेझर जेट प्रिंटर चोरून नेल्याची घटना २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:०० वाजता घडली होती. त्यांच्याविरुद्ध जिल्हा बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलक करण्यात आला होता.
चौघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
अधिक माहिती अशी की, भांडारपाल रामकृष्ण पाटील राहणार विमल पाटील नगर भुसावळ यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस हद्दीमधील राहणारे, गोपाल हरी जगताप (वय-१९) रा. तुकारामवाडी जळगाव, राहुल लक्ष्मण राजपूत (वय-२२) रा. आयोध्या नगर जळगाव, ऋषिकेश श्रीराम कोळी (वय-२०) रा. वाल्मीक नगर जळगाव, शुभम सुनील तायडे (वय-२१) रा. खोटेनगर जळगाव असे आरोपीचे नाव आहे. मा.पो. निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेका गणेश शिरसाळे, पो.ना किशोर पाटील, सचिन पाटील, पो.का मुकेश पाटील, छगन तायडे, विशाल कोळी, अशांनी आयोध्या नगर जळगाव येथुन ताब्यात घेतले त्यांनी सदर गुन्हाची कबुली दिली. त्यांनी चोरून केलेल्या मुद्देमाल हस्तगत केला. पुढील तपासकामी चौघांना जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात आले आहे.